आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस अध्यक्षपद : राहुल गांधी अाज अर्ज भरणार, एकमेव उमेदवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठी राहुल गांधी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करतील. विद्यमान अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंग त्यांचे सूचक असतील. या निवडीत राहुल एकटेच उमेदवार असतील, असा अंदाज आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून रविवारपर्यंत इतर कोणाचाही अर्ज दाखल झालेला नव्हता. 


सूत्रांनुसार, राहुल गांधी यांच्या उमेदवारीसाठी इतर सूचकांमध्ये गुलाब नबी आझाद, ए. के. अँटनी, पी. चिदंबरम, सुशीलकुमार शिंदे, अहमद पटेल आणि काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची नावे आहेत. सोमवारी विविध राज्यातील काँग्रेसचे प्रतिनिधीही अकबर रोडवरील पार्टी मुख्यालयात पोहोचतील. 

 

शहजाद यांचा हल्लाबोल  
या निवडणूक प्रक्रियेत सरदार पटेलसारखा माझाही अपमान झाला, असे राज्यातील नेते शहजाद पूनावाला यांनी म्हटले. शहजाद यांनी या निवडणुकीत होत असलेला गैरव्यवहार समोर आणल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या प्रचारादरम्यान सांगितले आहे. 

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, राहुल यांच्या उमेदवारीस राज्यातील नेते सूचक आणि भाजप अस्वस्थ म्हणूनच काँग्रेसवर हल्ले ... 

बातम्या आणखी आहेत...