आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दाऊदच्या हस्तका’वरून राष्ट्रवादी- भाजपत ‘वाॅर’, निवडणुकीत मदतीचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘अंडरवर्ल्ड डाॅन दाऊदचा हस्तक अाणि बिल्डर िरयाझ भाटी हा गेल्या दोन वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांसमवेत िदसून आला आहे. भाजपशीही तो जोडला गेला असल्याने लोकसभा, िवधानसभेच्या प्रचारात भाजपच्या अनेक उमेदवारांना त्याने मदत केली होती,’ असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी शुक्रवारी केला. मात्र, राष्ट्रवादीचे हे अाराेप खाेडून काढताना मलिक यांच्यावर बदनामीचा दावा ठोकण्यात येईल, असा इशारा भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी तसेच भाजपचे मुंबई अध्यक्ष अाशिष शेलार यांनी िदला अाहे.

मलिक म्हणाले, ‘शेलार व भाटीचे जवळचे संबंध असून वांद्रे िवधानसभा िनवडणुकीत भाटीने शेलारांना मदत केली होती. लोकसभेतही भाटी भाजपला उघडपणे मदत करत होता. आपण भाजप कार्यकािरणीत असल्याचेही त्याने सांिगतले होते. भाटीमुळेच शेलार वांद्र्यामधून िनवडून आले. भाजपमध्ये प्रवेश िदल्याच्या बदल्यात भाटीने शेलारांना मदत केली. तसेच वर्साेवा मतदारसंघात िवनायक मेटेंचा उमेदवार भाजपच्या िचन्हावर िनवडणूक लढवत होता. मात्र, या उमेदवाराला कोणीही ओळखत नसतानाही तो निवडून आला. भाटीने मदत केल्यानेच हा उमेदवार िनवडून आला. दाऊद टोळी वांद्रे व अंधेरीसह मंुबईत भाजप उमेदवारासाठी काम करताना िदसत होती. शेलारांच्या घरी भाटीची ऊठबस असून िवल्सन िजमखाना िवकत घेऊन एमसीएची (मुंबई िक्रकेट असोसिएशन) मते भाटीने हाती ठेवली अाणि त्याच्या मदतीमुळेच शेलार एमसीएवर िनवडून आले’ असे अाराेप मलिक यांनी केले.
मलिक यांच्या आरोपाला शेलारांनी उत्तर दिले. ‘मुंबई महापालिकेत भाजप बहुमतांनी िनवडून येणार असल्याने मलिक यांना आतापासूनच िडसेंट्री लागली अाहे. त्यामुळेच ते वाटेल ते आरोप करत आहेत. भाटी हा भाजप कार्यकारिणीत नव्हता अाणि माझाही त्याच्याशी काहीच संबंध नाही. मलिक यांच्यावर आपण अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहोत.’ तर माधव भंडारी म्हणाले, ‘मलिक हे वाट्टेल तसे आरोप करत सुटले आहेत. भाजपशी काडीचाही संबंध नसताना मलिक हे ओढून ताणून भाटीला पक्षाशी जोडू पाहत आहेत. मलिक यांना प्रकरण भारी पडू शकते. खरे तर रियाज भाटी कोण आहेत हे शरद पवारांनाच विचारायला हवे. पवार यांनीच त्याला ‘एमसीए’वर एका महत्त्वाच्या पदावर घेतले हाेते, असा टाेला भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी लगावला आहे.

दरम्यान, भाजपने दिलेले अाव्हान मलिक यांनी स्वीकारले अाहे. ‘मी जे काय बोललो त्यात तथ्य असते, त्यामुळे मी कोणाच्या नोटिसांना घाबरणार नाही. यापूर्वीही मंत्री िगरीश बापट यांनी माझ्यावर दावा दाखल केला आहे. पंकजा मुंडे, चारुदत्त पालवे यांच्या नोटिसा मला आलेल्या आहेत. यामुळे भंडारी, शेलार व भाटी यांचे आव्हान मी स्वीकारतो,’ असे मलिक म्हणाले.

दाऊदशी संबंध नाही : भाटी
दरम्यान, दाऊद किंवा भाजपशी संबंध नसल्याचे स्पष्टीकरण भाटीने दिले अाहे. मलिक यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठाेकणार असल्याचेही त्याने सांगितले. मी ‘एमसीए’च्या मार्केटिंग कमिटीचा अध्यक्ष आहे. त्यामुळेच आशिष शेलार व शरद पवारांशी भेट हाेते, असे स्पष्टीकरणही त्याने दिले.

भाटीवर माेक्का लावण्यासाठी काेर्टात जाणार : मलिक
‘२०१५ मध्ये छोटा राजनच्या अटकेनंतर जल्लाेष करण्यासाठी दाऊदने जोहान्सबर्गला ठेवलेल्या पार्टीत जाण्यासाठी निघालेल्या भाटीला मुंबई िवमानतळावर अटक झाली हाेती.
त्याच्याकडील दोन पासपोर्ट जप्त केले हाेते. भाटी नावाने एक पासपोर्ट २००७ मध्ये जयपूरवरून काढला हाेता, तर दुसरा २०१३ मध्ये िरयाज नावाने मिळाला होता. मात्र, बनावट पासपोर्ट व गंभीर गुन्हे असताना भाटीला १५ िदवसांत जामीन िमळाला. गुंड टोळ्यांशी संबंध असतानाही भाटीवर मोक्का लावण्यात आला नाही. तो आता लावण्यात न आल्यास आपण याचिका दाखल करू’, असे मलिक यांनी सांिगतले.
बातम्या आणखी आहेत...