आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडस्ट्री म्हणजे करणला वडिलांनी गिफ्ट केलेला स्टुडीओ नव्हे, कंगनाचे खरमरीत प्रत्युत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलीवूड आणि वाद हे समिकरणच आहे. झगमगाट असलेल्या या इंडस्ट्रीमध्ये रोज नवनवीन वाद पाहायला मिळतात. असाच आणखी एक वाद आता समोर आला आहे. हा वाद आहे प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आणि बॉलीवूडची क्वीन बनलेली कंगना रनोट यांच्यातील. कॉफी विथ करण या करण जोहरच्याच शोमध्ये या वादाचा सुरुवात झाली आणि आता हा वाद अगदी शिगेला पोहोचल्याचे समोर येत आहे. करणच्या शोमध्ये कंगनाने तोंडावर करणवर टीका केली होती. करणने लंडनमधील एका मुलाखतीत या टीकेवर भाष्य केले. त्यावर पुन्हा कंगनाने एका मुलाखतीत करणवर आणखी बोचरी टीका केली आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेऊयात. 
 
असे होते संपूर्ण प्रकरण..
- करण जोहरच्या शोमध्ये कंगनाने करणवर थेट टीका केली होती.
- करण केवळ स्टार्सच्या मुलांना त्याच्या चित्रपटात संधी देतो असी कंगना म्हणाली होती. 
- मी जर एखादा चित्रपट तयार केला तर त्याच करणला मुव्ही माफियाची भूमिका देईल असेही कंगना म्हणाली होती. 
- कंगना रनोटच्या या टीकेवर करण जोहरने लंडनमध्ये एका कार्यक्रमात भाष्य केले होते. 
- कंगनाला जर या इंडस्ट्रीमध्ये एवढा त्रास होत असेल तर कंगनाने इंडस्ट्री सोडावी असे करण म्हणाला होता. 
- प्रत्येक वेळी आपण स्त्री असल्याचा अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने वापर करू नये असेही करण जोहर म्हणाला होता. 
- करण जोहरच्या या वक्तव्यालादेखिल कंगनाने लगेचच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतून प्रत्युत्तर दिले. 
- मला इंडस्ट्रीतून जायला सांगायला ही इंडस्ट्री म्हणजे करणला त्याच्या वडिलांनी भेट दिलेला एखादा स्टुडिओ नाही. 
- उलट करण हा या इंडस्ट्रीचा एक छोटासा भाग आहे. 
- करणला माझ्या वक्तव्यावर आक्षेप होता तर शोमध्ये ते दाखवायचे नव्हते पण त्यांना टीआरपी हवी होती, असेही कंगना म्हणाली. 
- आपण कंगनाला बोलायला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला असे करण म्हणाला होता. त्यालाही कंगनाते प्रत्युत्तर दिले. 
- मी करणच्या शोपूर्वी अनेक मोठ्या मुलाखती दिल्या आहेत. त्यामुळे मला त्याच्या प्लॅटफॉर्मची काय गरज असे कंगना म्हणाली. 
- कंगना वुमेन कार्डचा वापर करत असल्याचे करण म्हणाला होता, त्याला प्रत्युत्तर देताना कंगना म्हणाली. करण नुकताच एका मुलीचा बाप बनला आहे. त्याने त्याच्या मुलीला हे वुमेन कार्ड कसे वापरायचे हे शिकवावे. 
 
पुढील स्लाइडसवर वाचा, कंगना करणमध्ये कसा वाढला वाद..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...