आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुशखबर : राज्यातील 27 महापालिकांमधील नगरसेवकांच्या मानधनात भरघोस वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्याच्या महापालिकांमधील लोकप्रतिनिधींच्या मानधनात वाढ करणारा शासन निर्णय नगरविकास विभागाने शनिवारी काढला. राज्यात २७ महानगरपालिका असून यापूर्वी २०१० मध्ये लोकप्रतिनिधींच्या मानधनात वाढ करण्यात आली होती.
 
महापालिकांची चार दर्जात वर्गवारी करण्यात आली असून अ प्लस वर्ग-२५००० रुपये, अ वर्ग -२०००० रुपये), ब वर्ग -१५००० रुपये आणि क वर्गवारी असलेल्या पालिकांतील लोकप्रतिनिधींना १० हजार रुपये मासिक मानधन मिळेल. यापूर्वी २०१० मध्ये मनपा नगरसेवकांचे मानधन निश्चित केले होते. त्यात नंतर वाढ झाली नव्हती. पूर्वी हे मानधन अ वर्ग -१० हजार, ब वर्ग -७५००, क वर्ग-७५०० आणि ड वर्ग पालिकांसाठी मासिक ७ हजार रुपये होते. राज्यात बृहन्मुंबई ही एकमेव महापालिका अ प्लस वर्गामध्ये आहे. पुणे, नागपूर अ वर्गात, पिंपरी चिंचवड, ठाणे आणि नाशिक ब वर्गात, कल्याण -डोंबिवली, वसई- विरार, नवी मुंबई आणि औरंगाबाद या क वर्गात तर उर्वरित सर्व महानगरपालिका या ड वर्गात आहेत.
बातम्या आणखी आहेत...