आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसोटीत सलामीला खेळण्याची माझी तयारी : रोहित शर्मा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई  - मी कसोटीतच कधीच टॉप-३ मध्ये फलंदाजी केलेली नाही, तरीही मला सलामीवीर म्हटले जाते. टीम इंडियासाठी गरज पडल्यास मी कसोटीत सलामीला खेळण्यास तयार आहे, असे भारताचा फलंदाज रोहित शर्माने म्हटले. फिटनेस मिळवण्यासाठी रोहित शर्मा सध्या विजय हजारे ट्रॉफीत मुंबईकडून खेळत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आगामी दोन कसोटींसाठी संघात निवड व्हावी म्हणून तो फिटनेस सिद्ध करत आहे.
 
रोहित म्हणाला, “संघ व्यवस्थापनाने मला कसोटीत सलामीला खेळण्यासाठी सांगितले तर मी याबाबत विचार करू शकतो. मी लगेच नकार देईल, असे नाही. मात्र, सर्व निर्णय घेण्यापूर्वी विचार करावा लागतो. वनडेत माझ्याकडे सलामीची जबाबदारी कशी आली? त्या वेळी संघाला माझा खेळ सलामीवीराच्या भूमिकेसाठी योग्य वाटला.’ लंडनमध्ये शस्त्रक्रियेला जाण्याआधी रोहितने तीन कसोटींत तीन अर्धशतके काढली होती.  

मुरली विजय संघाबाहेर
दुखापतीमुळे मुरली विजय बंगळुरुात खेळू शकला नाही. लोकेश राहुलसोबत अभिनव मुकुंद सलामीला खेळला. गेल्या काही महिन्यांत भारताकडून मुरली विजय, गौतम गंभीर, लोकेश राहुल, अभिनव मुकुंद, पार्थिव पटेल, शिखर धवन सलामीला खेळले आहेत. मात्र, अजून भारताची सलामीची जोडी निश्चित झालेली नाही. 
बातम्या आणखी आहेत...