आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायरसी थांबवण्यासाठी कायदेशीर पावले उचलणार : विनोद तावडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई  - मराठी चित्रपट जास्तीत जास्त रसिकांपर्यंत पोहाेचविण्यासाठी आणि चित्रपटांची पायरसी थांबविण्याच्या दृष्टीने कायदेशीर पावले उचलण्याबाबत राज्य सरकार सहकार्य करेल. तसेच मराठी चित्रपट खेड्यापाड्यात आणि प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी त्या चित्रपटाचा सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रसार करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी चित्रपट निर्मात्यांना दिले.   
 
दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत शनिवारी मराठी चित्रपट निर्मात्यांना अनुदान प्रदान करण्यात आले. या वेळी विविध चित्रपट संस्थेचे निर्माता आणि दिग्दर्शक उपस्थित होते. चित्रपट निर्मितीस अर्थसाहाय्य करतानाच यापुढे मराठी चित्रपटांच्या प्रमोशनसाठी अर्थसाहाय्य करण्याबाबत विचार करता येईल का, याबाबतचे मत आणि भूमिका सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी जाणून घेतली. राज्य सरकार म्हणून मराठी चित्रपटसृष्टीच्या पाठी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
बातम्या आणखी आहेत...