आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉट्सअॅप जोकमुळे चपराशाने नोंदवला प्राचार्याविरुद्ध गुन्हा; प्राचार्याचे उच्च न्यायालयात अपील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- व्हॉट्सअॅपवर जोक पाठवल्याने एका शाळेच्या चपराशाने प्राचार्यांविरुद्ध एफआयआर नोंदवला असून तो रद्द करावा, यासाठी प्राचार्याने मुंबई उच्च न्यायालयात अपील केले. 
 
मुंबईतील एका खासगी शाळेच्या प्राचार्यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर एक जोक पाठवला होता. हा जोक भारतीय दंड विधान व अॅट्रॉसिटी कायद्याचे उल्लंघन असल्याचे सांगत त्यांच्याच शाळेच्या चपराशाने प्राचार्याविरुद्ध एफआयआर दाखल केला. हा जोक शेअर केल्याबद्दल बिनशर्त माफी मागण्यास तयार असाल तर २० एप्रिलपर्यंत तसे शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश न्या. प्रकाश नाईक व न्या. एस. सी. धर्माधिकारी यांच्या खंडपीठाने  प्राचार्यांना दिले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...