आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाऊदच्या मुंबईतील 12 मालमत्तांचा होणार लिलाव, पण खरेदी कोण करणार?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील बारा मालमत्तांचा लिलाव होणार आहे. छोटा राजनला भारतात आणल्यानंतर आता दाऊदच्या गंडस्थळावर घाव घालण्यासाठी सरकारने मोठा जामानिमा केलाय खरा; पण गुन्हेगारी विश्वाशी संबंधित अशा लिलावांचा पूर्वेतिहास पाहता कोट्यवधी रुपयांच्या या मालमत्ता विकत घेण्यासाठी कोण पुढे येणार? याबद्दल उत्सुकतेसोबतच साशंकताही आहे. कारण या मालमत्तांची खरेदी म्हणजे थेट दाऊदशी पंगा आणि तपास यंत्रणांचा ससेमिरा असा दुहेरी ताप...म्हणूनच या लिलावाला कसा प्रतिसाद मिळतो त्याकडे सरकार, पोलिस आणि गुन्हेगारी विश्वाचेही लक्ष लागले आहे.
दाऊद पाकिस्तानात असला तरी त्याची मुंबईतील आपल्या आर्थिक व्यवहारांवर करडी नजर असते. मुंबईत आपल्या सुरुवातीच्या काळात साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करून नैतिक किंवा अनैतिक मार्गाने दाऊदने उभ्या केलेल्या साम्राज्याच्या काही खुणा आजही या मालमत्तांच्या रूपाने त्याच्या दहशतीची साक्ष देत या शहरात उभ्या आहेत. पूर्वी कधीकाळी त्याच्या पुढेमागे फिरणारे छाडमाड तरुण आताशा बिल्डर किंवा तत्सम व्यवसायात स्थिरावलेत. तेच आता या मालमत्तांसह त्याचे आर्थिक व्यवहार छुपेपणाने हाताळतात. दाऊद भारतातून पळून गेल्यानंतर या मालमत्ता आयकर विभागाने हळूहळू ताब्यात घेतल्या. सरकारी कागदपत्रात आजही या मालमत्ता सील केल्याची नोंद असली तरी वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. दाऊदच्या हस्तकांमार्फत या मालमत्तांचा आजही बिनधास्तपणे व्यावसायिक वापर होतो आहे. हे सर्व उघड्या डोळ्यांनी दिसत असूनसुद्धा सरकारी यंत्रणा काहीच करू शकत नाही. कारण या मालमत्ता सील केल्या तरी त्या अवैधरित्या पुन्हा ताब्यात घेतल्या जातात. यावर उपाय म्हणून आता या मालमत्तांचा लिलाव करण्याचा उपाय आयकर विभागाने आजमावण्याचे ठरवले आहे.
अशा लिलावांना मिळणाऱ्या तुरळक प्रतिसादाविषयी माजी आयपीएस अधिकारी सुधाकर सुराडकर यांना विचारले असता ते म्हणाले की, पूर्वीदेखील दाऊदच्या एका मालमत्तेचा लिलाव करण्यात आला होता. त्यावेळी त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र हल्ली गुन्हेगारी विश्वाची भीती तितकीशी राहिली नसल्याने यावेळी कदाचित या लिलावाला चांगला प्रतिसाद मिळेल.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा..,
दाऊदच्या मुंबईतील स्थावर मालमत्ता कोणत्‍या ?
किती आहे मालमत्‍तांची किंमत?
कोण करणार लिलाव?
काय आहेत लिलावाच्या अटी?