आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनगर आरक्षणासंदर्भातील अहवाल नोव्हेंबरपर्यंत द्यावा, मुख्यमंत्र्यांचे टाटा विज्ञान संस्थेला निर्देश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या वेळी आरक्षणासंदर्भात टाटा समाज विज्ञान संस्थेने केलेल्या अभ्यासाच्या प्रगतीचा आढावा घेऊन हा अभ्यास अहवाल टाटा समाज विज्ञान संस्थेने येत्या नोव्हेंबरपर्यंत शासनाकडे पाठवावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.  ‘धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्यासंदर्भात पुरावे गोळा करून सखोल अहवाल करण्यासाठी टाटा समाज विज्ञान संस्थेने काम सुरू केले आहे. सर्वेक्षण व इतर अभ्यासातून तयार झालेला अहवाल हिवाळी अधिवेशनापूर्वी म्हणजेच नाेव्हेंबर महिना अखेरीपर्यंत देण्यात यावा,’ असे फडणवीस म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...