आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांघरुणात लपून पाहिले चित्रपट, आता मिळते मानवंदना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या पंधरवड्यात व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यांचा चित्रपट मुक्ती भवन चा प्रीमियर झाला तेव्हा लोकांनी त्यांना १० मिनिटे त्यांना उभे राहून मानवंदना (स्टंॅडिंग ओव्हेशन दिले) टाळ्यांच्या कडकडाटीने चित्रपट सभागृह गुंजत राहिला. आणि जगभरातील चित्रपट जगताशी संबंधित दिग्गजांनी त्याच्या तारिफेचे पूल बांधले. हा चित्रपट तयार केला आहे. २५ वर्षीय शुभाशीष भूटियानी याने. जो बोर्डिंग शाळेतील दिवसात दिवसादेखील पांघरुणात पोर्टेबल डीव्हीडी प्लेअर लपवून अनेकदा चित्रपट पाहाताना पकडला गेला आहे.

दिव्य मराठीशी बोलताना त्यांनी सांगितले की, मी बालपणापासूनच चित्रपटासाठी वेडा राहिलेलो आहे. ते म्हणतात की, जेव्हा मी मसुरीच्या वुडस्टॉक बोर्डिंग शाळेत शिकत होतो. तेव्हा नेहमीच वसतिगृहात पांघरुणाच्या आत डीव्हीडी ठेवून चित्रपट पाहताना पकडला जात होतो. वॉर्डन आणि शिक्षक समजावून सांगत, बोलणीही पडत. डीव्हीडी प्लेअरदेखील जप्त केला जाई. पण पुन्हा काही दिवसाने हेच होत असे. चित्रपट पाहणे हे माझे ध्येयच होते मी त्याबाबत ध्येयवेडाच होतो. शुभाशीषने राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे. २०१४ मध्ये त्यांना त्यांचा चित्रपट कुशसाठी हा पुरस्कार मिळाला होता. त्यांचा हा लघुचित्रपट श्रेष्ठ प्रमोशनल फिल्म म्हणून निवडला गेला होता. शुभाशीष सांगतात की, बालपणी माझा असा एखादाच दिवस असे की, ज्या दिवशी मी चित्रपट पाहिला नाही. वडील माझ्यासाठी दररोज एक डीव्हीडी घेऊन येत असत. शुभाशीष जेव्हा बोर्डिंग शाळेत होता तेव्हा त्यांच्या एका शिक्षकांना त्यांनी एका शीख मुलाला १९८४ च्या दंगलीतून वाचविण्याची कहाणी ऐकवली होती. बस मग तेव्हापासून त्यांच्या डोक्यात ही घटना बसली होती. अशातच जेव्हा ते फिल्म मेकिंगच्या शिक्षणासाठी न्यूयॉर्क स्कूल ऑफ व्हिज्युअल आर्ट‌्स ला गेले तेव्हाच त्यांनी हा चित्रपट बनवायचाच असा मनाशी पक्का निर्धार केला होता. खरे पाहता त्या वेळी शुभाशीष ला आपल्या प्रकल्पासाठी एक चित्रपट बनवायचाच होता. तेव्हा त्यांनी कुश नावाचा एक चित्रपट बनविला होता. फारच कमी बजेट आणि साहित्यात तयार झालेला हा चित्रपट ऑस्करच्या स्पर्धेत पहिल्या १० चित्रपटांमध्ये जाऊन पोहोचला. याच चित्रपटाने ७० व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ओरीजॉन्टी अवॉर्ड आणि हंॅपटन्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्यूरी पुरस्कार जिंकला.

शुभाशीष सांगतात की, ते १६ वर्षांच्या वयापासूनच चित्रपट निर्मितीशी कोणत्या न कोणत्या स्वरूपात संबंधितच राहिले आहेत. ते सांगतात की, ते नेहमी अभ्यासात सरासरीच राहिले. पण खेळांची व रंगभूमीची त्यांना बालपणापासूनच हौस होतीच. यासाठी त्यांना अनेकदा बोलणीदेखील पडली. बास्केटबॉल हा त्यांचा आवडता खेळ होता. ते म्हणतात की, जेव्हा आपण कधी बाहेर निघतो तेव्हाच आपल्याला जग बऱ्यापैकी कळू लागते, समजते.
ते सांगतात की, जेव्हा मी शिक्षणासाठी न्यूयॉर्कला गेलो तेव्हा तिथे मला विविध संस्कृत्या समजून घेण्याची संधी मिळाली. ज्याची मला चित्रपट निर्मितीत फार मोलाची मदत होते. ते सांगतात की, जीवनात कधीही नाकारले होण्यापासून घाबरू नका. कारण की प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी नाकारला (रिजेक्ट) जातोच. मीदेखील अनेकदा रिजेक्ट झालेलो आहे. पण हा तर आपल्या कामाचा एक भागच असतो. ते सांगतात की, मी खुश अाहे कारण मी जे करताे, जे मी करू इच्छित होतो.

लघुचित्रपटांच्या बाबतीत शुभाशीष सांगतात की, यांचे सातत्याने निर्मित होणे फारच महत्त्वाचे, गरजेचे आहे. कारण की हे एक असे माध्यम आहे की, जे तरुण मुलांसाठी नवनवीन कल्पना शोधणे आणि त्यावर काम करण्याची संधी देताहेत. यासाठी आपण चित्रपट निर्मितीशी संबंधित लहान लहान बारकावे शिकू शकत आहात. जसे की कॅमेरा कसा वापरावा. आणि चित्रपट कसे बनवतात. शुभाशीष शाहरुख खानला बॉलीवूडमध्ये जीवनात सर्वाधिक प्रभावीत आजोबांपासून आहेत.
बातम्या आणखी आहेत...