आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठवाड्यातील जिल्हा बँकांना सरकारकडून सापत्न वागणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नागपूर जिल्हा बँकेला मदत करता मग दुष्काळी मराठवाड्यातील अडचणीत अालेल्या जिल्हा बँकांना फडणवीस सरकार मदत का देत नाही, असा जाब राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित यांनी बुधवारी सरकारला विचारला. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नागपूर जिल्हा बँकेला परवाना दिल्यासंदर्भातील विधान परिषदेत निवेदन केले. त्यावेळी पंडित यांनी मराठवाड्यातील िजल्हा बँकांना सरकार सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप केला.

‘नागपूर जिल्हा बँकेला सरकारने मार्च २०१५ मध्ये १३१ कोटी ७४ लाखांची तर ऑक्टोबर २०१५ मध्ये २४ कोटी ८१ लाखांची मदत केली. एकंदरीत १५६ कोटी ५५ लाख रुपयांची मदत करण्यात आली. त्यामुळे या बँकेला रिझर्व्ह बँकेच्या सात टक्के सीआरआरची पूर्तता करता आली. परिणामी रिझर्व्ह बँकेने १४ मार्च रोजी नागपूरला बँकेला बँकिंग परवाना मंजूर केला अाहे,’ अशी माहिती सहकारमंत्री पाटील यांनी दिली.

अमरसिंह पंडित यांच्या अाराेपावर स्पष्टीकरण देताना महसूलमंत्री एकनाथ खडसे म्हणाले, ‘ज्या जिल्हा बँकांमुळे शेतकऱ्यांच्या ठेवी बुडाल्या आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मात्र, तरी बँका अडचणीत आहेत, म्हणून शेतकऱ्यांना कर्जापासून वंचित ठेवता येणार नाही. अडचणीतील बँकांनाही मदत करण्याचे सरकारचे धोरणच अाहेच.’
अडचणीतील बँकांना सरकार अार्थिक मदत देणार का?
‘नागपूर जिल्हा बँकेसाठी थेट पंतप्रधान कार्यालयातून मदत मिळते. मग सरकार दुष्काळी मराठवाड्यातील जिल्हा बँकांना मदत करणार आहे का?’, असा सवाल अमरसिंह पंडित यांनी उपस्थित केला. दुष्काळी मराठवाड्यातील बहुतांश सर्वच जिल्ह्यांत पीक पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आढळून आली आहे. लातूर आणि औरंगाबाद जिल्हा बँका वगळता मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड आणि जालना या जिल्हा बँका मोठ्या आर्थिक अडचणीत आहेत. या बँका शेतकऱ्यांना पुरेसा कर्ज पुरवठा करू शकत नाहीत. राष्ट्रीयीकृत आणि इतर व्यापारी बँका पीककर्ज देण्यात आखडता हात घेतात. अशा परिस्थितीत राज्य सरकार या अडचणीतील जिल्हा बँकांना मदत करणार आहे का?’, अशी विचारणा पंडित यांनी केली. या वेळी काँग्रेसचे आमदार अमर राजूरकर यांनी ‘जिल्हा बँका बुडवून जे लोक भाजपमध्ये गेले त्यांच्यावरची कारवाई थंड का पडते’, असा सवाल उपस्थित केला.
बातम्या आणखी आहेत...