आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इम्पॅक्ट: नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या डॉ. वर्षा लहाडे निलंबित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नाशिक जिल्हा रुग्णालयातील गर्भपातप्रकरणी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वर्षा लहाडे यांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. नाशिक जिल्हा रुग्णालयातील गर्भपात प्रकरणाचा ‘दिव्य मराठी’ने नुकताच पर्दाफाश केला होता.  दरम्यान, डाॅ. लहाडे यांच्यावर फाैजदारी कारवाई हाेण्याचीही शक्यता अाहे.

याबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार,  डॉ.वर्षा लहाडे यांची प्राथमिक चौकशी पूर्ण झाली असून या चौकशीदरम्यान त्यांनी २० आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीच्या गर्भाचा गर्भपात करून कायद्याचे उल्लंघन केल्याची बाब समोर आली आहे. त्यांनी नियमबाह्य पद्धतीने या प्रकरणाच्या नोंदींमध्ये फेरफार केले असून पीसीपीएनडीटी कायद्याचेही उल्लंघन केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून आता याप्रकरणी एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहितीही डॉ. सावंत यांनी दिली. माजी न्यायमूर्ती व माजी आरोग्य संचालकामार्फत चौकशी केली जाणार असल्याचेही डॉ. सावंत म्हणाले.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...