आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारचालकाने मायलेकींना चिरडले मुंबईतील घटना, कारचालकाला अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दारूच्या नशेत भरधाव गाडी चालवून फुटपाथवर झोपलेल्या माय- लेकींना चिरडल्याची घटना डोंबिवलीतील गिरनार चौकात बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. या घटनेत ४० वर्षीय महिलेसह तिच्या दहा वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी इक्बाल शेख (२४) याला अटक केली आहे. इक्बाल हा दारूच्या नशेत भरधाव गाडी चालवत होता.

या वेळी त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याच्या इनोव्हा कारने समोरून येणाऱ्या स्कोडा गाडीला धडक दिली. त्यानंतर फुटपाथवर झोपलेल्या मायलेकींना त्याच्या गाडीने चिरडले. या अपघातात मायलेकींचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी इक्बालला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. रामनगर पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात दारू पिऊन गाडी चालवणे, समोरच्या गाडीचे नुकसान करणे, तसेच हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबईत ड्रंक अँड ड्राइव्हच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे.