आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. आंबेडकर स्मारक भूमिपूजन चार रोजी मोदींच्या हस्ते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दादरमधील इंदू मिल येथील जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चार ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. याच दिवशी मुंबई मेट्रोच्या कामाचेही भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते केले जाणार आहे. मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत वास्तूरचनाकार शशी प्रभू यांनी तयार केलेला आराखडा मंजूर करण्यात आला असून यासाठी त्यांना पहिला हप्ता देण्याचेही मान्य करण्यात आल्याची माहिती
सूत्रांनी दिली. शशी प्रभू यांनी काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारकडे आराखडा सादर केला होता.
आनंदराज आंबेडकर यांनीही सौरभ चटर्जी या वास्तूरचनाकाराने तयार केलेला आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द केला होता. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शशी प्रभू यांचा आराखडा मंजूर करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या स्मारकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा, बाबासाहेबांच्या जीवनातील महत्त्वाच्या दृश्यांची भित्तीचित्रे, भव्य ग्रंथसंग्रहालय, धम्मधारणा करण्यासाठी जागा असून चैत्यभूमी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक यांना जोडणारा समुद्राच्या बाजूने रस्ताही तयार करण्यात येणार आहे. जे चैत्यभूमीवर येतील ते थेट डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाकडे जाऊ शकतील अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती आहे.