आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तूर्तास शिक्षकांची पोलिस पडताळणी व गुन्ह्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सक्तीचे नाही : तावडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सीबीएसईने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पोलिस पडताळणी व गुन्ह्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सक्तीचे केले आहे. मुंबईत काही शाळा अशी सक्ती करत आहेत. मात्र, राज्य मंडळाच्या शाळांत अशा सक्तीचा विचार नाही, असे शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी स्पष्ट केले.  गुरगावातील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रद्युम्न ठाकूर या विद्यार्थ्याच्या हत्येनंतर केंद्रीय मनुष्यबळ विभागाने सर्व केंद्रीय शाळांना शिक्षकांकडून पोलिस पडताळणी आणि गुन्ह्याबाबत प्रतिज्ञापत्र घेण्याचे आदेश दिले अाहेत.

 

लवकरच हेही बदल 

- गेल्या वर्षी दहावी व बारावी प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर फुटल्या होत्या. त्यामुळे बोर्डाकडून पाठवण्यात येणारे प्रश्नपत्रिकांचे गठ्ठे परीक्षा केंद्रात फोडून वर्गनिहाय वितरणाची पद्धत बंद केली जाईल. प्रत्येक वर्गात सीलबंद प्रश्नपत्रिका पाठवून थेट विद्यार्थ्यांच्या हाती पेपर देण्याबाबत विचार चालू आहे.
- विद्यार्थी आणि पालकांनाही शुल्क नियंत्रण समितीपुढे दाद मागता येईल. त्याबाबतच्या नियमावलीला अंतिम स्वरूप दिले जात आहे.

 

बातम्या आणखी आहेत...