आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळांचे शैक्षणिक शुल्क समान पातळीवर अाणणार : शिक्षणमंत्री विनाेद तावडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘शाळा अापापल्या पद्धतीने वेगवेगळे शुल्क अाकारतात. सर्व शाळांचे शैक्षणिक शुल्क किमान पातळीवर समसमान करण्याचा सरकारचा प्रयत्न अाहेे. त्यासाठी २०११ च्या महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियमात सुधारणा करण्यात येणार असून जानेवारीअखेरपर्यंत अंमलबजावणी करण्यात येईल,’असे शालेय शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.  


संस्थाचालकांकडून शैक्षणिक शुल्कात लूट करण्यात येते; परंतु सध्या अस्तित्वात असलेल्या नियमामुळे प्रभावी पावले उचलता येत नाहीत, अशी तक्रार पालकांकडून वारंवार करण्यात येत हाेती. या पार्श्वभूमीवर शैक्षणिक संस्थांमध्ये शैक्षणिक शुल्क एकसमान असावे तसेच शैक्षणिक शुल्क सुधारणेचा प्रारुप अाराखडा तयार करण्यासाठी ६ मे २०१७ राेजी निवृत्त न्यायाधीश व्ही.जी. पळशीकर यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात अाली. त्यानंतर समितीने सात महिने या कायद्यातील सुधारणांसंदर्भात अभ्यास केला. या कालावधीत समितीने पालकांच्या अाणि संस्थाचालकांच्या प्रतिनिधींबराेबर दहा बैठका घेतल्या. शुल्क विनियमन सुधारणांसंदर्भातील अहवाल समितीने बुधवारी राज्य शासनाकडे सादर केला अाहे. याचा अभ्यास करून मार्चपूर्वी अधिनियमामध्ये बदल करण्यात येईल, असेही तावडे यांनी सांगितले.  

 

समितीने सुचवलेले बदल  
१. मूळ कायद्यात शैक्षणिक संस्थेला शुल्कवाढीबाबत समितीकडे अर्ज करण्याची तरतूद हाेती. अाता पालकांना समितीने सुचवलेल्या सुधारणेनुसार शुल्क नियंत्रण समितीकडे अर्ज करण्याची संधी.  
२. पालक - शिक्षक संघटनेच्या कार्यकारिणी समितीत संस्थाचालकांचे प्राबल्य असल्याची पालकांची तक्रार हाेती. ती दूर करण्यासाठी पालक - शिक्षक संघटनेमध्ये प्रत्येक इयत्तेतून एक पालक निवडण्याएेवजी दाेन पालकांची निवड करण्यात येईल.

 

बातम्या आणखी आहेत...