आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकांचे \'रण\': प्रचाराच्या तोफा थंडावल्या, आता सुरू होणार मतदारराजाच्या \'भेटीगाठी\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईसह राज्यातील 10 प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीच्या प्रचाराच्या तोफा सायंकाळी थंडावल्या. मंगळवारी 21 तारखेला या 10 महानगरपालिकांसाठी मतदान होणार आहेत. तर 23 तारखेला निकाल समोर येणार आहे. त्यामुळे मतदानापूर्वी केवळ एक दिवस आणि दोन रात्रींचा काळ उमेदवारांच्या हाती असल्याने आता थेट मतदारांशी गाठी भेटी घेण्यावर भर असणार आहे. मतदारांना जास्तीत जास्त आपल्या बाजुने कसे वळवता येईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न या काळात होत, असल्याचे आजवर पाहायला मिळाले आहे. 

या निवडणुकांच्या प्रचारात यंदा प्रामुख्याने शिवसेना आणि भाजप यांची एकमेकांवरील चिखलफेक हा प्रामुख्याने चर्चेचा मुद्दा ठरला. विशेषतः मुख्यमंत्र्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवल्याचे पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे यांनी युती तोडल्याची घोषणा केल्यानंतर फडणवीसांनी शिवसेना आणि मुंबई मनपाच्या कारभारावर जहरी टीका केली. उद्धव यांनी तर सामना आणि इतर माध्यमांतून आधीपासूनच वेळोवेळी थेट मोदींपासून भाजपला धारेवर धरले होते. 

मनसेने यावेळी प्रचाराला काहीसा उशीर केल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरे यांच्या वैयक्तीक कारणामुळे प्रचाराला उशीर केल्याचे सांगण्यात आले. पण अखेरच्या तीनच दिवसांत आपला ठसा उमटवण्यात राज ठाकरे यशस्वी ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले. नाशिकमधील कामाचा आढावा लोकांसमोर मांडत राज ठाकरेंनी मते मागितली. 

काँग्रेस राष्ट्रवादीचा फारसा जोर लावलेला दिसला नसला तरी, पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांसह सर्व दिग्गज नेत्यांना प्रचारात उतरवत सत्ता मिळवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. या सर्व प्रचारात काँग्रेसची पिछेहाट झाल्याचे पाहायला मिळाले. अगदी मोजक्या सभा आणि त्याशी फारशा परिणामकारक नसल्याचे चित्र पाहायला मिळाले.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...