आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात चार टप्प्यांतील न.प. निवडणूक जाहीर, संबंधित क्षेत्रांत आचारसंहिता लागू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील एकूण १९२ नगर परिषदा व २० नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ४ टप्प्यांत २७ नोव्हेंबर, १४, १८ डिसेंबर २०१६आणि ८ जानेवारी २०१७ रोजी मतदान होत आहे. शिवाय नगरपरिषदांचे अध्यक्ष निवडण्यासाठीही याच दिवशी मतदान होईल. मतदानानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सोमवारी ही घोषणा केली. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्याने मुंबई शहर, उपनगर व ठाणे वगळता राज्यभर आदर्श आचारसंिहता लागू झाली आहे.

नगर परिषद िनवडणुकीसाठी संगणक प्रणाली
आगामी काळात मुदत संपत असलेल्या राज्यातील १९० नगर परिषदा व ४ नगर पंचायती; तर नवनिर्मित २ नगर परिषदा व १६ नगर पंचायतींचा यात समावेश करण्यात आला आहे. राज्यातील या सर्वच नगर परिषदांसाठी बहुसदस्यीय पद्धतीनुसार आणि थेट अध्यक्षपदांसाठी निवडणूक होणार आहे. तर नगर पंचायतींच्या निवडणुका एकसदस्यीय पद्धतीने होतील. उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे सहज भरता यावीत म्हणून खास संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून या माध्यमातून उमेदवारांची सोय व्हावी व त्यात पारदर्शकता निर्माण व्हावी म्हणून काळजी घेण्यात आली आहे.

जात वैधता प्रमाणपत्राचा पुरावा
संबंधित नगर परिषदांच्या राखीव प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे; परंतु जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची पोच पावती सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. अशा उमेदवारांना निवडून आल्याचे घोषित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे, अन्यथा त्यांची निवड रद्द करण्याची संबंधित अधिनियमात तरतूद करण्यात
आली आहे.

असे भरता येईल नामनिर्देशनपत्र...
नगर परिषदांसाठी बहुसदस्यीय पद्धतीनुसार आणि थेट अध्यक्षपदांसाठी निवडणुका होणार आहेत. संबंधित संकेतस्थळावर देण्यात आलेल्या नामनिर्देशनपत्रे आणि शपथपत्रात आवश्यक ती सर्व माहिती भरून उमेदवारांना त्याची प्रत काढावी लागेल. यावर स्वाक्षरी करून ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे प्रत्यक्ष जाऊन निर्धारित वेळेत सादर करावे लागणार आहे.

मराठवाड्यातील या ठिकाणी होणार निवडणूक
टप्पा १ : २७ नाेव्हेंबर

जालना : १) जालना, २) भोकरदन, ३) अंबड व ४) परतूर.
परभणी : १) गंगाखेड, २) सेलू, ३) जिंतूर, ४) मानवत, ५) पाथरी, ६) सोनपेठ व ७) पूर्णा.
हिंगोली : १) हिंगोली, २) वसमत ३) कळमनुरी.
बीड : १) बीड, २) माजलगाव, ३) परळी-वैजनाथ, ४) अंबेजोगाई, ५) गेवराई ६) धारूर.
उस्मानाबाद : १) उस्मानाबाद,
२) परंडा, ३) भूम, ४) कळंब,
५) तुळजापूर, ६) नळदुर्ग,
७) मुरूम ८) उमरगा.
टप्पा २ : १४ डिसेंबर
लातूर
१) उदगीर, २) औसा, ३) निलंगा ४) अहमदपूर.
टप्पा ३ : १८ डिसेंबर
औरंगाबाद
१) वैजापूर,
२) कन्नड, ३) पैठण, ४) गंगापूर
५) खुल्ताबाद.
नांदेड
१) धर्माबाद, २) उमरी, ३) हदगाव, ४) मुखेड, ५) बिलोली, ६) कंधार, ७) कुंडलवाडी, ८) मुदखेड, ९) देगलूर, १०) अर्धापूर (न.पं.) ११) माहूर (न.पं.).
{१९२ नगर परिषदांच्या थेट अध्यक्ष निवडीसाठी होणार मतदान
बातम्या आणखी आहेत...