आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी कंपन्यांकडून स्वस्तात वीज खरेदी करणार-ऊर्जामंत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘मागीलसरकारने वीजनिर्मितीची परवानगी दिल्यानंतर खासगी कंपन्यांनी उत्पादन सुरू केले खरे, परंतु ग्राहकच मिळत नसल्याने आणि सरकारबरोबर करार (पॉवर पर्चेस अॅग्रीमेंट) केलेली नसल्याने ही वीज उत्पादन केंद्रे बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. मात्र, या कंपन्यांकडून स्वस्त दरात वीज घेण्याचा विचार राज्य सरकार करीत असून याबाबतचे ठोस धोरण लवकरच आणले जाईल,’ अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली.
राज्यात सध्या विजेची कमरतरता नाही. महाजनको ५५०० मेगावॅट आणि खासगी कंपन्या ५५०० मेगावॅट वीजनिर्मिती करीत आहेत. याशिवाय सोलर, पवनचक्क्यातूनही राज्याला वीज उपलब्ध होत आहे. आपण दरराेज १७ हजार ५०० मेगावॅट विजेची निर्मिती करू शकतो. त्यामुळे राज्यात विजेची कमतरता नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी लोडशेडिंग असते ते केवळ पाण्याअभावी.
जर शेतकऱ्यांना २४ तास वीज दिली तर पाणीउपसा वाढेल आणि जमिनीतील पाणीसाठा लवकर संपुष्टात येईल. त्यामुळेच आपण शेतकऱ्यांना आठच तास वीज देत आहोत, असे स्पष्टीकरणही बावनकुळे यांनी दिले.
जुने प्रकल्प बंदच करणार
राज्यातइंडिया बुल्स (५०० मेगावॅट), धारीवाल एनर्जी (६०० मेगावॅट), आयडियल एनर्जी (५४० मेगावॅट), गुप्ता एनर्जी (१२० मेगावॅट), अभिजित एनर्जी (२४६ मेगावॅट) असे हे खासगी प्रकल्प आहेत. त्यांच्याकडून स्वस्त दरात वीज घेण्याची योजना अाहे. १५ दिवसांत त्याला मंजुरी मिळताच आणखी हजार मेगावॅट वीज मिळेल. सध्या प्रतिदिन १७५०० मेगावॅट आवश्यकता असून २०२०-२५ पर्यंत ही गरज ५० हजार मेगावॅटपर्यंत जाईल. त्यामुळे नवीन प्रोजेक्ट सुरू करावेच लागणार आहेत. त्याएेवजी खासगी कंपन्यांकडूनच स्वस्त वीज घेतली जाईल. तसेच जे प्रोजेक्ट ३०-३५ वर्षे जुने आहेत त्यामुळे विजेचा दर पाच ते साडेपाच रुपयांपर्यंत जातो. मात्र, खासगी कंपन्यांकडून तीन ते सव्वातीन रुपयांत वीज मिळत असल्याने जुने प्रोजेक्ट बंद केले जातील, असेही बावनकुळे म्हणाले.
जपान देणार अद्ययावत पंप
राज्यातीलशेतकऱ्यांना पाच वर्षांत पाच लाख सोलर कृषिपंप बसवण्याचे उद्दिष्ट आहे. त्याबरोबरच ३० टक्के विजेची बचत करणारे कृषिपंप देण्याचीही योजना अाहे. त्याबाबत मंगळवारी दिल्लीत बैठक झाली. यात जपानच्या कंपनीने ३० टक्के वीज बचत करणाऱ्या कृषिपंपाचे सादरीकरण केले. हा पंप २८ ते ३२ हजार रुपयांना उपलब्ध होणार असून विजेची बचत मोठ्या प्रमाणावर होणार आहे. याला केंद्र सरकारही मदत करणार असल्याचेही ऊर्जामंत्र्यांनी सांगितले.