आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जलयुक्त’मध्ये गैरव्यवहार; चार अधिकाऱ्यांचे निलंबन, रामदास कदम यांनी उघड केला भ्रष्टाचार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रत्नागिरी जिल्ह्यातील जलयुक्त शिवार याेजनेच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा अाराेप राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केला हाेता. त्यावरून भाजपचे नेते, जलसंधारण मंत्री राम शिंदे व कदम यांच्या शाब्दिक वादही झाला हाेता. दरम्यान, याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या चाैकशीत कदम यांच्या अाराेपात तथ्य असल्याचे उघडकीस अाले असून याप्रकरणी कृषी खात्यातील चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची शिफारस समितीने 
केली अाहे.  

रत्नागिरी जिल्ह्यातील दापाेली, खेड व मंडणगड तालुक्यात झालेल्या जलयुक्त शिवारची कामे निकृष्ट झाली अाहेत. तसेच काही कामे न करताचा ठेकेदारांना पैशाचे वाटप करण्यात अाले. अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताने हा भ्रष्टाचार झाल्याचा अाराेप रामदास कदम यांनी केला हाेता. मात्र, संबंधित खात्याचे मंत्री राम शिंदे यांनी हे अाराेप फेटाळून लावले हाेते. तसेच याच मुद्द्यावरून कदम व शिंदे या दाेन कॅबिनेट मंत्र्यांमध्ये खडाजंगीही झाली हाेती. इतकेच नव्हे, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही या गैरव्यवहारावर टीका केली हाेती. तर ‘अाघाडी सरकारच्या कार्यकाळातील सिंचन गैरव्यवहार व या सरकारमधील जलयुक्त शिवार घाेटाळ्यात फरक ताे काय?’ असा प्रश्न युवा सेनेचे अध्यक्ष अादित्य ठाकरे यांनी उपस्थित केला हाेता. मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्राेजेक्ट असलेल्या या अभियानावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात अाल्यामुळे भाजप व शिवसेनेमध्ये तणाव निर्माण झाला हाेता.    मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाल्याचे सांगितले जात हाेते. दरम्यान, राम शिंदे यांनी हे अाराेप फेटाळले असले तरी मुख्यमंत्र्यांनी मात्र  कदम यांच्या अाराेपांची गंभीर दखल घेत रत्नागिरीचे जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांनी चाैकशीचे अादेश दिले हाेते. त्यानुसार या कामांच्या चाैकशीसाठी एक समिती नेमली हाेती. पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाैकशीत कृषी खात्याचे चार अधिकारी दाेषी अाढळले.
 
सरकारकडून अालेला निधी अधिकाऱ्यांनी दाबला
जलयुक्त शिवारच्या कामांसाठी राज्य शासनाकडून कृषी खात्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या खात्यात निधी जमा झाला हाेता. मात्र, हा पैसा संबंधित ठेकेदाराला देण्यात अाला नाही. तर निलावणे येथे निकृष्ट दर्जाचे काम करूनही ठेकेदाराला तत्काळ पैसे देण्यात अाले. दरम्यान, या कामात दाेषी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी शिफारस जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी खात्याच्या सहसंचालकांकडे केली अाहे.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...