आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमली पदार्थाच्या बाजारपेठेत 'इफेड्रिन'चा वाढता बोलबाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कर्करोग व दम्यासारख्या श्वसनविकारावरील औषधांतील घटक म्हणजे इफेड्रिन. पण याखेरीज मेथएमफेटाइन हा अमली पदार्थ तयार करण्यासाठीही इफेड्रिनचा बेकायदा वापर होतो. कोणताही गंध नसलेल्या व खडीसाखर किंवा काचेसारख्या दिसणाऱ्या मेथएमफेटामाइनला क्रिस्टल, आइस या नावाने ओळखले जाते. उच्चभ्रूंच्या पार्ट्यांत मेथएमफेटामाइनला सध्या कमालीची मागणी आहे. चवीला कडवट असलेला हा पदार्थ पाणी, दारू, सिगारेट किंवा इंजेक्शनद्वारे घेतला जातो. याची झिंग चढते तशीच झपाट्याने उतरतेही. थोड्या थोड्या अंतराने याचे सेवन केले जाते. इतरांच्या तुलनेत स्वस्त असल्याने त्याचा वापर जास्त असावा असा पोलिसांचा कयास आहे.

कर्करोग व श्वसनविकारांवर औषधी निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना इफेड्रिन वापरासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून परवाना दिला जातो. त्याच्या साठ्यावर मात्र मर्यादा नाहीत, अशी माहिती ठाणे गुन्हे शाखेचे उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली. मात्र किती साठा केला, किती उत्पादन केले, किती साठा उरला ही आकडेवारी कंपनीला प्रशासनाला नियमितपणे द्यावी लागते. सोलापूरचा जप्त साठा कंपनीच्या लेखापरीक्षणात दाखवलेला नव्हता.
सोलापुरात अव्हाॅन कंपनीचा गोरखधंदा
सोलापूर - तीन दिवसांच्या तपासात अडीच टन अॅसेटिक अनहेड्राइडचा व साडेनऊ टन इफेड्रिनचा साठा जप्त झाला असला तरी अाणखी तीन टन इफेड्रिन गेले काेठे? याचा तपास पोलिस यंत्रणा करत आहे. पोलिसांच्या चार टीम तपासकामात गुंतल्या आहेत. यात दोन आरोपींना अटक करण्यात आली असली तरी मुख्य सूत्रधार पुनित श्रींगी अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही.

> ४० एकर कंपनीचे साम्राज्य : अव्हॉन आॅरगनिक्स कंपनीचे क्षेत्र ४० एकर आहे. कंपनीने पत्रा शेड करून दोन भाग केलेत. एका भागात कंपनीचे कामकाज, तर मोकळ्या जागेवर गोडाऊन आहे. येथेच बेकायदेशीर इफेड्रिनचा साठा आढळून आला. तेथे पोलिस बंदोबस्त आहे.

> तीनपैकी दोन कंपन्या राज्यात : इफेड्रिनपासून औषध बनवणाऱ्या देशभरात तीन कंपन्या आहेत. यातील दोन महाराष्ट्रातील अलिबाग व सोलापूर येथे आहेत. अव्हॉन ऑरगनिक्स २००० मध्ये सुरू झाली. मात्र, २०१२ मध्ये अमेरिकी औषध प्रशासनाने परवाना रद्द केला होता.

> प्रत्येक कर्मचाऱ्याचे जबाब : ठाणे गुन्हे शाखेचे उपायुक्त, सहायक आयुक्त, निरीक्षक अशी ४० जणांची टीम आहे. औषध प्रशासनाचे सहआयुक्त व ८ औषध निरीक्षकांची दोन पथके कंपनीचे रेकॉर्ड तपासत आहेत. चार दिवसांपासून कर्मचाऱ्यांचे जबाब घेतले जात आहेत.

> तीन विभागाची लागते परवानगी... : कंपनी कच्चा माल खरेदी करताना, त्यापासून उत्पादन तयार करताना, मालाची साठवूणक करताना व उत्पादित मालाची विक्री करताना केंद्रीय उत्पादन शुल्क, नार्को व औषध प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. अॅसिटिक अनहॅड्रॉइड हा मादक पदार्थ बनवण्यातील सर्वांत महत्त्वाचा घटक. एक ग्रॅम अफूच्या पावडरवर लिक्विड अॅसिटिक अनहॅड्रॉइडचे थेंब, मोलॅसिसची प्रकिया केल्यास ३०० ते ४०० रुपये ग्रॅम हेरॉइन, ड्रग तयार हाेते, असे पोलिस सू़त्रांनी सांगितले.

> स्वामीला पकडले बस स्टँडवरच : अॅव्हॉनचा स्वामी नावाचा कर्मचारी इफेड्रीन पावडरचे छोटी मोठी पाकिटे कंपनीतून अाणून चिंचोळी एमआयडीसीच्या बसस्टॉपवर अाणून पुरवत असे. कोणीतरी कारमधून येऊन त्याच्याकडून ते पाकिटे घेत व मार्गस्थ होत. स्वामीवर नजर ठेवून पोलिसांनी त्याला बसस्टॉपवरच पकडले. त्याच्या माहितीवरून कंपनी जाळयात अडकली.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, सोमलता झाडापासून बनते.... चीन व भारतातून अमेरिकेत.... दहा वर्षे सश्रम कारावास, किमान एक लाखाचा दंड....