आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईव्हीएम फेरफारप्रकरणी कोर्टाचे चौकशीचे निर्देश; हैदराबादची प्रयाेगशाळा देणार सविस्तर अहवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनद्वारे (ईव्हीएम) निवडणुका पारदर्शक होत नसल्याचा आरोप देशभरातील विविध पक्षांकडून होत अाहे. या पार्श्वभूमीवर २०१४ मधील पुण्याच्या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील एका बूथवरील ‘ईव्हीएम’बाबत मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे निर्देश दिले आहेत. या मतदारसंघातील  मतदान व मतमोजणीदरम्यान ईव्हीएममध्ये काही फेरफार झाला होता का? याची चौकशी करून अहवाल देण्याचे निर्देश हैदराबाद फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला देण्यात आले अाहेत.

या निवडणुकीत काँग्रेसचे अभय छाजेड हे भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्याकडून पराभूत झाले होते. १५ ऑक्टोबर २०१४ रोजी हे मतदान झाले, तर १९ ऑक्टोबर २०१४ रोजी मतमोजणी झाली. छाजेड यांनी अॅड. प्रभाकर जाधव यांच्यामार्फत याचिका दाखल करून मिसाळ यांच्या निवडणुकीला आव्हान दिले आहे. त्यातच त्यांनी एक अर्ज केला होता. त्यावरील सुनावणीअंती न्या. मृदुला भाटकर यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना बूथ क्रमांक १८५ ची उपकरणे व तपशील एफएसएलकडे तपासणीसाठी पाठवण्याचे निर्देश दिले.
बातम्या आणखी आहेत...