आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबाने सोडली मुंबई, कुठे गेले याबाबत संभ्रम, फार्म हाऊसलाही कुलूप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिरानंदाणी येथील फ्लॅटसमोर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. - Divya Marathi
हिरानंदाणी येथील फ्लॅटसमोर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
मुंबई - कुलभूषण जाधव यांचे कुटुंब सध्या नेमके कुठे आहे, याबाबत काहीशी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर मुंबईतील हिरानंदाणी गार्डन येथील त्यांच्या फ्लॅटवर सुरक्षा वाढवण्यात आली होती. पण याठिकाणाहून त्यांचे कुटुंब अज्ञात ठिकाणी गेले आहे. एका वृत्तपत्रातील माहितीनुसार कुलभूषण जाधव यांचे वडील सुधीर जाधव यांनी गावाला जात असल्याचे सांगितले. त्यांचे सातारा येथे एक फार्म हाऊस असून त्याठिकाणीही कुलूप असल्याची माहिती मिळाली आहे. सांगली हे त्यांचे गाव आहे. पण ते सांगलीतही नसल्याची माहिती मिळाली आहे. 
 
सुट्यांसाठी मुंबईत आले होते कुटुंब 
- जाधव यांच्या एका मित्राने दिलेल्या माहितीनुसार जाधव यांचे कुटुंब रविवारीच पुण्याहून मुंबईला आले होते. 
- जाधव यांची  पत्नी, दोन मुले (मुलगा शुभांकर-मुलगी भैरवी), आई हे मुंबईत आले होते. 
- हिरानंदाणी गार्डन्समध्ये सिल्व्हर ओक अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये ते थांबलेले होते. हा फ्लॅट जाधव यांचाच आहे. 
- सोमवारी जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्याची माहिती मिळताच या फ्लॅटची सुरक्षा वाढवण्यात आली होती. 
- सोमवारी त्यांचे कुंटुंब अज्ञात ठिकाणी निघून गेले. 
- जाधव यांच्या वडिलांनी मुलाला फाशी झाल्याची बातमी पाहून आम्ही गावी निघालो असे एका वृत्तपत्राला सांगितले.
- पण ते सातारा किंवा सांगलीला पोहोचले नसल्याची माहिती मिळाली आहे.
 
सांगलीत राहतात वडील आणि काका 
- जाधव यांचे वडील सुधीर आणि काका सुभाष मुंबईत पोलिस अधिकारी होते. सध्या ते सांगलीत राहतात. जाधव कुटुंबाचे साताऱ्यात एक फार्म हाऊसही आहे. पण त्याठिकाणीही कुलूप लागलेले आहे. 
- येथील लोक सांगतात की, कुलभूषण जेव्हाही याठिकाणी यायचे तेव्हा ते गावकऱ्यांची मदत करायचे. सामाजिक कार्यातही ते अग्रेसर होते. 
 
पुढे पाहा, साताऱ्यातील फार्म हाऊसचे PHOTOS
 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...