आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील एक लाख शेतकरी खासदारांना देणार गावची माती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भू्संपादन विधेयकाला विरोध करण्यासाठी आम आदमी पक्षातून हकालपट्टी झालेल्या योगेंद्र यादव यांच्या ‘स्वराज्य अभियान’ने कंबर कसली आहे. १० ऑगस्ट रोजी देशभरातून लाखभर शेतकरी आपापल्या गावची माती दिल्लीतील जंतरमंतरवर आणणार असून सर्व खासदारांना ती देण्यात येणार आहे.

भूसंपादन विधेयकातील बदलांविरोधात शेतकऱ्यांमध्ये संतापाचे मोठे वातावरण आहे. काँग्रेससह सर्व विरोधी पक्षाचाही या विधेयकाला विरोध आहे. ‘यूपीए’ सरकारचे भूसंपादन विधेयक होते तसे ठेवण्यात यावे. या मागणीसाठी राज्यातील ७० शेतकरी संघटना यादव यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आल्या आहेत. १ ऑगस्ट रोजी पंजाब राज्यातील ठिक्री येथून यादव यांच्या नेतृत्वाखाली जय किसान रॅली िनघाली आहे. १० ऑगस्ट रोजी ती दिल्लीतील जंतरमंतरवर पोहाेचेल. राज्यातून दोन हजार शेतकरी त्यात सहभागी होणार आहेत. दिल्लीस येणारा प्रत्येक शेतकरी गावातून येताना छोट्या मडक्यात माती घेऊन येईल. मातीशी इमान राखा, असा संदेश देण्यासाठी सर्व खासदारांना ती एका-एका मडक्यातून देण्यात येईल, अशी माहिती स्वराज्य अभियानाचे राज्य सरचिटणीस संजीव साने यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...