आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: अाघाडीने कर्जमाफी दिलेले मुंबईतील शेतकरी सापडेनात, आणखी एका घोटाळ्याचा संशय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सन २००९ मध्ये अाघाडी सरकारने मुंबईतील शेतकऱ्यांचे २८७ काेटी रुपयांचे कर्ज माफ केले हाेते. त्या वेळीही मायानगरी मुंबईत शेतकरी आहेत का, असा सवाल उपस्थित झाला हाेता. या सवालाचे उत्तर शोधण्यासाठी सहकार विभागाकडून गेल्या काही दिवसांपासून लाभार्थी शेतकऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे. मात्र, या शोधमोहिमेला काही केल्या यश मिळालेले दिसत नाही. मुंबईतील कोणत्या बँकेने किती कर्जमाफीसाठी पैसे वाटले याची माहिती समोर येत अाहे, मात्र  मुंबईकर शेतकऱ्यांचा शोध लागत नसल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात आणखी एक घोटाळा झाला असण्याचा संशय व्यक्त हाेत अाहे. 
  
फडणवीस सरकारने कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकऱ्यांची अाकडेवारी जाहीर केल्यानंतर ‘मुंबईत शेतकरी अाहेत कुठे?’ असा प्रश्न विराेधकांकडून उपस्थित करण्यात येत अाहे. मात्र, अाघाडी सरकारच्या काळातही मुंबईतील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात अाल्याचे समाेर अाल्यानंतर विराेधकांची बाेलती बंद झाली. अाता मुंबईत कुठे अाणि किती शेतकरी आहेत का, याचा शोध गेल्या काही दिवसांमध्ये सहकार तसेच कृषी विभागांकडून घेण्यात येत अाहे. पण कुलाब्यापासून ते मुलंुडपर्यंत अाणि चर्चगेटपासून ते दहिसरपर्यंत किती शेतकरी आहेत अाणि त्यांनी केवढे कर्ज घेतले होते, याचा पत्ता अजूनही लागलेला नाही. 

२००९ मध्ये जवळपास दीड वर्ष कर्जाचे वाटप करण्यात येत होते. या काळात कोणाला अाणि किती पैसे दिले, याची नोंद नक्कीच ठेवली गेली असणार, याचा विचार करून संबंधित बँका व यंत्रणेकडे सहकार विभागाचे अधिकारी सातत्याने चौकशी करत आहेत. मात्र शेतकऱ्यांची नावे व संख्याही मिळत नसल्याचे अधिकारी हताश झालेत. मुंबई समुद्रकिनाऱ्याला लागून असल्याने मासे पकडणे व त्याची विक्री करणे यावर किनारपट्टीतील हजारो लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. हे लक्षात ठेवून मत्स्यशेतीला मदत व्हावी या हेतूने मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना करण्यात आली होती. मत्स्यशेती असल्याचे मुंबईत दिसून येत असले तरी २००९ मध्ये या आैद्याेगिक शहरात कडधान्ये, भाजीपाला, फळबाग शेती होत असल्याचे दिसून आलेले नाही. 

बँकांकडून  कर्ज वितरित केलेल्या रकमेचा तपशील उपलब्ध झाला असला तरी लाभार्थी शेतकरीनिहाय यादी मुख्यालय स्तरावर उपलब्ध नाही, असे कळवण्यात अाले आहे. ही यादी अजूनही मिळत नसल्याने बाेगस शेतकऱ्यांच्या नावाने कर्ज काढली गेली असतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात दाेनदा कर्जमाफी झाली हाेती, मात्र या कर्जमाफीचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना झाला नसल्याचे आढळून आल्याने फडणवीस सरकारने आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात संबंिधत पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मुंबईत शेतकरीच नसतील तर पैसे कोणाच्या खात्यावर गेले, याचा शोध अजूनही संपलेला नाही. 
 
पुढील स्लाइडवर पाहा मुंबई जिल्ह्यातील बँकांनी शेतकऱ्यांना दिलेली कर्जे
बातम्या आणखी आहेत...