आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी आत्महत्या तपास पाेलिस निरिक्षकांमार्फत; वाढत्या आत्महत्यांमुळे सरकार चिंतेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शेतकरी आत्महत्यांच्या वाढत्या संख्येमुळे भाजप सरकारच्या जिवाला घोर लागला असून आत्महत्या खऱ्या की खोट्या हे आता पोलिस अधिकाऱ्यामार्फत तपासले जाणार आहे. शनिवारी शासननिर्णय काढून हा तपास सरकारने पोलिस िनरीक्षक िकंवा सहाय्यक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत केला जाणार असल्याचे स्पष्ट केले. 

आत्महत्येचे कारण तात्काळ शोधण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे यात म्हटले असले तरी शेतीऐवजी आत्महत्यांची वेगळी कारणे नीट तपासली जात नाहीत. परिणामी आत्महत्यांचा वाढता आकडा सरकारच्या अपयशाकडे बोट दाखवत असल्याचे जनमत तयार होत असल्यानेच हा निर्णय घेण्यात आला. आत्महत्याग्रस्त शेतकरी व शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत  वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन व मुख्यमंत्र्यांचे अपर सचिव यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. हा तपास आठवड्याच्या आत पूर्ण करून न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेने दोन िदवसांत अहवाल सादर करायचा आहे. 
बातम्या आणखी आहेत...