आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला पत्रकाराचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
मुंबई - महिला पत्रकाराचा एकाने विनयभंग केल्याची घटना मुंबईतील विलेपार्ले येथे बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी महिलेने तक्रार दिल्यानंतर संजय शर्मा या हॉटेल वेटरला अटक करण्यात आली आहे.
 
पीडित महिला ही इंग्रजी वृत्तपत्रात काम करते. सोमवारी रात्री ती आपल्या नातेवाइकांना भेटून विलेपार्ले रेल्वेस्थानकावरून घरी जात होती.  या वेळी अंधाराचा फायदा घेत शर्मा याने तिचा विनयभंग केला. त्यानंतर महिलेने त्याला पकडून पोलिसांना फोन केला. काही वेळातच  घटनास्थळी पोलिस दाखल झाले. महिलेने तक्रार दिल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...