आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार लांडगेंच्या बैलगाडीला विधानभवनापूर्वीच थांबा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विधानभवनात बैलगाडी नेऊन अभिनव आंदोलन करण्याचा प्रयत्न करणारे आमदार लांडगे यांनी बैलगाडीसमोर राहून अशी पोझ दिली. - Divya Marathi
विधानभवनात बैलगाडी नेऊन अभिनव आंदोलन करण्याचा प्रयत्न करणारे आमदार लांडगे यांनी बैलगाडीसमोर राहून अशी पोझ दिली.
मुंबई - राज्यात बैलांच्या शर्यतीवरील बंदी उठवावी यासाठी पिंपरी-चिंचवडचे आमदार महेश लांडगे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अभिनव आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी सोमवारी थेट विधानभवनात बैलगाडीने प्रवेश करण्याचा त्यांचा मनसुबा होता. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने त्यांचा हा मनसुबा अपयशी ठरला. शेवटी लांडगे यांनी नाइलाजास्तव मंत्रालयापासून नरिमन पॉइंटवरील भाजप प्रदेश कार्यालयापर्यंत बैलगाडी फेरी मारून आपले आंदोलन गुंडाळले.   

तामिळनाडूतील जल्लीकट्टू परंपरेच्या धर्तीवर राज्यातही बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू करावी यासाठी आमदार लांडगे यांच्यासह अनेक नेते सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र, त्यांच्या  प्रयत्नांना यश मिळत नव्हते. दरम्यान, जल्लीकट्टूसाठी तामिळनाडूतील जनता रस्त्यावर उतरली आणि त्यास हिरवा कंदील मिळाल्याने आता महाराष्ट्रातील जनतेच्या मनातही बैलगाडी शर्यत सुरू होण्याविषयीच्या आशा पल्लवित झाल्या. 

यासाठी महेश लांडगे यांनी थेट विधानभवनात बैलगाडी आणून सरकारचे लक्ष वेधून घेण्याचे ठरवले होते. पण विधानभवनात बैलगाडी घेऊन येण्यास पोलिसांनी परवानगी नाकारल्याने त्यांचा हिरमोड झाला. शेवटी बैलगाडी बाहेर ठेवूनच त्यांना विधानभवनात यावे लागले. तत्पूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नरिमन पाॅईंटवरील कार्यालयासमेार बैलगाडी नेत माध्यमांचे लक्ष वेधून घेतले. जनतेच्या रेट्यामुळे जल्लीकट्टू स्पर्धा सुरू करावी लागली. त्याप्रमाणे महाराष्ट्रात बैलगाडी शर्यत सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी  सकारात्मक भूमिका घेण्याची मागणी लांडगे यांनी केली आहे.  

विशेष म्हणजे बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात  यासंदर्भातील विधेयक मांडण्यात येणार आहे. जनतेसोबतच बहुतांशी लोकप्रतिनिधीही बैलगाडी शर्यत लवकरच सुरू व्हावी असे वाटते. यामुळे हे विधेयक मंजूर होण्यात काही अडथळे येतील, अशी शक्यता सध्या तरी दिसत नसल्याचे आमदार लांडगे यांच्याकडून सांगण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...