आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषिमंत्री 15 आमदारांसह परदेश अभ्यास दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांमुळे माझा दौरा रद्द केला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई   - ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील शेतकऱ्यांना कशा प्रकारे कर्जमाफी दिली जाते याची माहिती घेण्यासाठी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर सर्वपक्षीय आमदारांसह १५ दिवसांच्या परदेश दौऱ्यावर गेले आहेत. शेतकरी संकटात असताना कृषिमंत्र्यांनी परदेश दौरा रद्द करायला हवा होता, अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. विशेष म्हणजे २००९ मध्ये आघाडी सरकारनेही अशा दौऱ्याचे आयोजन केले होते तेव्हा भाजपने टीका केली होती, तरीही आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी दौरा पूर्ण केला होता.
  
राष्ट्रमंडळ संसदीय संघातर्फे राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर आणि अन्य १५ आमदार सचिवांसह अॉस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि सिंगापूरच्या १५ दिवसीय दौऱ्यावर गेले आहेत. या शिष्टमंडळामध्ये कृषिमंत्र्यांसोबत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, काँग्रेसचे आमदार संजय दत्त, शरद रणपिसे, माणिकराव ठाकरे, नीलम गोऱ्हे, राहुल नार्वेकर, विधानसभा सचिव अनंत कळसे यांच्यासह काही सचिव या दौऱ्यात आहेत. १ मेपासून सुरू झालेला हा दौरा १७ मेपर्यंत असून या दौऱ्यासाठी प्रत्येकी सहा लाख रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी निम्मा खर्च राज्य सरकार आणि निम्मा खर्च मंत्री, आमदार स्वतः करणार आहेत. 
 
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडवरून परत येताना सर्व आमदार एक दिवस सिंगापूरलाही थांबणार आहेत. शेतकरी कर्जमाफी, तूर खरेदी आदी समस्यांनी शेतकरी त्रस्त असताना कृषिमंत्री परदेश दौऱ्यावर गेल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...