आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्र्यांना परदेश दौऱ्यावरून परत बोलवा, पृथ्वीराज चव्हाण यांचे माेदींना पत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 मुंबई - ‘राज्यातील तूर उत्पादक शेतकरी अडचणीत व कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची आंदोलने सुरू असताना तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असताना राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट हे परदेश दौऱ्यावर आहेत. या दोन्ही मंत्र्यांनी अशा परिस्थितीमध्ये राज्यात राहणे आवश्यक होते. त्यामुळे आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या दोन्ही मंत्र्यांना परत बोलाविण्याचे निर्देश द्यावेत’, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.
 
तूर उत्पादक शेतकऱ्यांनी तुमच्या आवाहनाला प्रतिसाद देत तुरीचे मोठया प्रमाणात उत्पादन घेतले. मात्र, सरकारची तूर खरेदी यंत्रणा योग्य काम करत नसल्याने राज्यातील शेतकरी आता मोठ्या अडचणीत सापडला आहे.  एखाद्या कॅबिनेट मंत्र्याला जर परदेश दौऱ्यावर जायचे असेल तर त्यासाठी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाची परवानगी घेणे आवश्यक असते. या दोघांनीही तशी परवानगी घेतली असेलच. तरी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या दोन्ही मंत्र्यांना तत्काळ देशात परत बोलाविण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी यांना या पत्रातून केली आहे.
 
शिवसेना मंत्र्यांकडून घरचा आहेर
अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी संकटात असताना मंत्र्यांनी परदेश दौऱ्यावर जाणे हे असंवेदनशील पणाचे लक्षण आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी युती सरकारच्या काळात मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द केले होते,  अशी टिपण्णी करत पर्यटनमंत्री रामदास कदम यांनी फडणवीस सरकारला घरचा आहेर दिला आहे. विशेष म्हणजे या दाैऱ्यात शिवसेनेसह सर्वपक्षीय अामदारांचा समावेश अाहे.
 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...