आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता बिल्डरधार्जिणे निर्णय घेतात- माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता नियम डावलून बिल्डरधार्जिणे िनर्णय घेत असून त्यांना  लाभ पोचवत आहेत. संदीप येवले या सामाजिक कार्यकर्त्याने विक्रोळी झोपडपट्टी पुनर्विकास (एसआरए) प्रकल्पातील एक कोटी लाच प्रकरणाने त्यावर शिक्कामोर्तब झाले अाहे. प्रकाश मेहता यांची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्यात यावी, तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्यात यावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी केली.    
 
विक्रोळी येथील हनुमाननगर एसआरए प्रकल्पातील घोटाळा आता उघड झाला आहे. मात्र, यापूर्वी गृहनिर्माण मंत्री या नात्याने मेहता यांनी अनेक बेकायदेशीर व वादग्रस्त निर्णय घेतले आहेत. एसआरएच्या एका प्रकल्पात मेहता यांनी संबंधित बिल्डरास लाभ होईल, असा िनर्णय घेतला होता. त्याच्या बातम्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी मेहता यांचा तो  वादग्रस्त निर्णय तत्काळ रद्द करवला, असे चव्हाण यांनी सांगितले.  विक्रोळीच्या हनुमाननगर एसआरए प्रकल्पातील भ्रष्टाचार व अनागोंदी संदीप येवले यांच्यामुळे समोर आला आहे. यात सनदी अधिकारी, मंत्री आणि बिल्डर असे तिघेही दोषी आहेत. याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करायला पाहिजे. 
 
मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी : मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेहतांववर कारवाई करावी.  भ्रष्टाचारास कुणाला तरी जबाबदार धरायला हवे. अन्यथा, ‘तुम्ही खुशाल भ्रष्टाचार करा. मात्र, पकडले जाऊ नका, असा संदेश जाऊ शकतो, असेही ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...