आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूच्या नशेत एखाद्या मुलीची मूकसंमती वैध नाही, सामूहिक बलात्कार प्रकरणातील जामीन फेटाळला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  महिला जर नशेत असेल तर कोणत्याही पुरुषाला तिच्यावर बळजबरी करता येणार नाही. सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी अभिनय साही याच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने अशा प्रकारची टिप्पणी केली.  न्या. मृदुला भाटकर यांनी या निर्णयात म्हटले : मुलगी नशेत होती. म्हणजे सहमती देण्याच्या अवस्थेत नव्हती. 
 
महिलेचा नकारच ती संबंध करू इच्छित नाही, असा होतो. जर तिचा होकार असेल तेव्हा ती पूर्णपणे स्वतंत्र आणि शुद्धीत व स्वेच्छेने तिने संमती दिलेली असावी. दारू किंवा इतर प्रकारच्या नशेत तिने दिलेला होकार वैध ठरत नाही. “कोणी मूकसंमती दिली असेल तर तीसुद्धा सहमती मानता येत नाही,’ असे न्यायालयाने म्हटले. न्यायधीश म्हणाले, बलात्काराच्या व्याख्येत तिच्या इच्छेविरुद्ध आणि तिच्या सहमतीशिवाय असे शब्द योजले आहेत. “तिच्या सहमतीशिवाय’ या शब्दाचा अर्थ खूप व्यापक आहे. न्यायालयाने इतर दोन सहआरोपींना मात्र जामीन दिला.  

न्यायालयाची विचारणा : नशेत होती मग घरी सोडण्याऐवजी तिला फ्लॅटवर का नेले?  
पीडिता पुण्यातील एका कंपनीत कार्यरत होती. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये कंपनीच्या वतीने देण्यात आलेल्या पार्टीत तिचा सहकारी अभिनय साही याने तिला नशा येणारे पेय दिले आणि दोन मित्रांसह तिच्यावर बलात्कार केला. साहीच्या वकिलांनी सांगितले : पीडिता स्वत: दारू प्यालेली होती. वेटरने तिला चार वेळा कॉकटेल दिल्याची साक्ष आहे. न्या. भाटकर म्हणाल्या : अारोपीला याचा फायदा देता येणार नाही. जर पीडिता नशेत होती, ती चालू शकत नव्हती. मग अारोपीने तिला तिच्या घरी का नेऊन सोडले नाही? 
बातम्या आणखी आहेत...