आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलन : 'आमंत्रणाची वाट नको सहभागी व्हा तरच मराठी होईल जागतिक भाषा'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आषाढी, एकादशीला पंढरपूरची वारी निघते. पण साहित्य संमेलन हीदेखिल साहित्याची वार्षिक वारी आहे. त्यात सहभागी होण्यासाठी साहित्यिकांनी निमंत्रणाची वाट न बघता सहभागी व्हावे, तरच मराठी जागतिक भाषा होईल. हा संदेश दिला आहे ग्रंथ दिंडीत सहभागी झालेल्या सोलापूरच्या गाडगेबाबांनी. 

हातात झाडू डोक्यावर खापर घातलेले खैराव गावचे फुलचंद नगर टिळक सगळ्यांचे आकर्षण ठरले. पाणी वाचवा-पाणी आडवा,  लेक वाचवा हा संदेश देतानाच मराठी भाषा जागतिक पातळीवर न्यायची असेल तर मराठी टिकवली पाहिजे. आमंत्रणाची वाट न बघता या सहित्याच्या उत्सवात सहभागी झाले पाहिजे. आपण जे लिहितो ते आचरणात आणले पाहिजे असेही ते सांगतात.

शेतकरी टिकला तर जग टिकेल 
साहित्य संमेलनात ग्रामीण भागातून आलेल्या साहित्यिकांची उपेक्षा होते ती थांबली पाहिजे. त्यांची व्यवस्था करणे संयोजकांची जबाबदारी आहे. ग्रामीण भागातून दरवर्षी 100 पेक्षा जास्त साहित्यिक येतात या कडेही त्यांनी लक्ष वेधले. गेल्या 10 वर्षापासून साहित्य संमेलनात गाडगेबाबा होऊन येणारे टिळक स्वतः लेखक आहेत. 2000 महाविद्यालयात शौचालय उभारण्याचा आणि ती वापरण्याचा संदेशही ते देत आहेत. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS अखेरच्या स्लाइडवर पाहा Video..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...