आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पा आले ! पुण्यात मानाचे पाचही गणपती विराजमान, मुख्‍यमंत्र्यांनीही केली सहकुटुंब पूजा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वर्षभर आतुरतेने वाट पाहत असलेल्या भाविक भक्तांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचे आज जोरदार आगमन होत आहे. मुंबई, पुण्यासह राज्यभरात आणि देशातही सकाळपासूनच घरोघरी लाडक्या बाप्पाचे स्वागत सुरू झाले आहे. पुण्यामध्ये मानाच्या पाचही गणपतींची स्थापना झाली. या मानाच्या गणपतींच्या वाजत गाजत मिरवणुका काढण्यात आल्या होत्या.
पुण्यातील मानाचे पाचही गणपती दुपारपर्यंत विराजमान झाले. मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपतीबरोबरच, तांबडी जोगेश्वरी, तुळशीबाग, केसरीवाडा, गुरुजी तालीम या मानाच्या गणपतींचे वाजत गाजत आगमन झाले. मिरवणुकांमधून दुपारपर्यंत या सर्व गणरायांची स्थापणा करण्यात आली.
सार्वजनिक गणेश मंडळांचे गणपती दुपारनंतर विराजमान होणार असले तरी लाखो भाविकांच्या घरात गणेश स्थापनेला अगदी सकाळपासूनच सुरुवात झाली आहे. मुंबई, पुण्यात तर घरगुती गणेशोत्सव साजरा करणार्‍यांच्या खरेदीची लगबग कालपासूनच सुरू झालेली होती. बाप्पाला घरी नेण्यासाठी भाविक खासगी वाहनांसह रेल्वे, रिक्षाचा वापर करत होते. कोकणातही पारंपरिक पद्धतीने गणरायाचे आगमन झाले.
मुख्‍यमंत्र्यांच्‍या घरी स्‍थापना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या सरकारी निवासस्थानी सोमवार गणरायाची प्राणप्रतिस्थापना करण्यात आली . मुख्यमंत्र्यांनी पत्नी अमृता , मुलगी दिविजा आणि आई सरिता यांच्‍यासोबत 'श्रीं'ची पूजा करून प्राणप्रतिष्‍ठा केली.
पुढील स्लाइड्सवर पाहा, राज्यातील गणेशोत्सवाची लगबग...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...