आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश विसर्जनासाठी गिरगाव चौपाटी सज्ज, पालकमंत्र्यांनी केली पाहणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दोन लाखांहून अधिक गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटी सज्ज झाली असून यासाठी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या तयारीची पाहणी मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी केली.

गणेश विसर्जनासाठी गिरगाव चौपाटी हे मुंबईतील महत्त्वाचे ठिकाण असून या ठिकाणी बहुसंख्य गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, स्वच्छता विभाग, अभियांत्रिकी विभाग आदींनी केलेले काम अभिनंदनीय आहे. अनंत चतुर्दशीनिमित्त करावी लागणारी सर्व व्यवस्था करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिस, वाहतूक पोलिस, जिल्हाधिकारी, मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी गणेश विसर्जन हे आपले काम म्हणून हाती घेतले आहे. अनंत चतुर्दशी हा "वर्ल्ड क्लास इव्हेंट" असून ही आपल्या राज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री, विदेशी पर्यटक आदी मान्यवर येत असतात. त्यामुळे आपण सर्वांनी एकजुटीने हा सोहळा साजरा करण्याचे आवाहनही देसाई यांनी केले. या वेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजॉय मेहता, मुंबईच्या जिल्हाधिकारी शैला ए. यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची
उपस्थिती होती.
पुण्यातही बंदोबस्त
राज्यातील प्रमुख गणेश विसर्जन मिरवणूक असलेल्या पुण्यनगरीत कायदा व सुव्यवस्था राहण्यासाठी तसेच दहशतवादी कारवाया राेखण्यासाठी पाेलिसांतर्फे माेठा फाैजफाटा तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पाच हजार ४३८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून बीएसएफ, अारएएफ, एसअारपीएफ, फाेर्स वन, क्यूअारटी, बीडीडीएसची कंपनी अाणि टीम शहरात दाखल झाल्या आहेत.