आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कागदाच्या लगद्यापासून पर्यावरण संवर्धक बाप्पा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पर्यावरणाची हानी करणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसला (पीओपी) विरोध होत असला तरी भव्य गणेशमूर्ती पीओपीपासूनच होतात, असे सांगणाऱ्यांना चोख उत्तर देण्याचे काम एका तपापासून एक मूर्तिकार करत आहे. कागदाच्या लगद्यापासून भव्य मूर्ती घडवणारे अविनाश पाटकर यांनी वयाची साठी ओलांडली तरी सामाजिक जागरूकतेसाठी त्यांचा लढा सुरूच आहे. मुंबईतील नामांकित जीएसबी गणेश मंडळानेही यंदा कागदी लगद्याचा गणपती बसवला आहे. राजकोट, सुरत, दिल्लीतही हे कागदी गणपती.

पोहोचले आहेत.
ग्रँट रोडवर पाटकर यांचा गौतमी आर्ट्स हा कारखाना आहे. जुन्या वर्तमानपत्रांच्या रद्दीपासून एक ते १४ फुटांपर्यंतच्या मूर्ती तेथे तयार होतात. यात पाटकर यांच्या पत्नी ज्योती, मुलगी गौतमी, बंधू आशिष, त्यांची पत्नी शिल्पा व त्यांचा मुलगा पीयूष हे काम करतात. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक तरुणांनी असे गणपती तयार केल्याने पाटकर यांच्या उपक्रमाला चळवळीचे रूप येत आहे. अविनाश यांचे वडील नारायण पाटकर उत्तम मूर्तिकार आहेत. जे. जे. स्कूलॉफ आर्टमध्ये मूर्तिकला शिकलेले अविनाश ३५ वर्षांपासून मुलांना पिगी बँक, पेन स्टँड, फ्लॉवर पॉट, मोबाइल स्टँड अशा वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण देतात. वर्षभर अध्यापन कार्य केल्यावर अविनाश वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या नक्षीकाम केंद्रात रुजू झाले होते. २००३ पासून कागदी मूर्ती ते बनवतात.

हलक्या व सहज विरघळणाऱ्या : आधी मी घरच्या घरी मूर्ती करत होतो. कागदी लगद्याच्या मूर्ती वजनाने हलक्या व पाण्यात सहज विरघळणाऱ्या व पर्यावरणपूरक आहेत. हे लोकांना पटले. शाडूच्या मूर्तीपेक्षा २० ते ४० टक्के महाग असतानाही लोकांकडून हळूहळू मागणी वाढत गेली. यंदा एक ते १४ फुटांच्या सहा व दोन फुटांच्या २० कागदी मूर्ती बनवल्याचे पाटकर सांगतात.

३५ फुटी कागदी मूर्ती
ही मूर्ती अितशय हलकी असून बारा वर्षांचा मुलगाही ती सहज उचलून नेऊ शकतो. शाडू व पीओपीप्रमाणेच सुबक व आकर्षक कागदी मूर्ती पाण्यात सहज विरघळते. कागदाच्या लगद्यापासून २० ते ३५ फूट उंचीची मूर्ती बनवू शकतो, असे पाटकर म्हणाले.