आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेनेरिक औषधांला विराेध नकाेच, सरकारने दुकाने सुरू करावीत, दिग्दर्शक सत्यजित भटकळ यांचे मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जेनेरिक औषधांच्या वापराबाबत केंद्र सरकार स्वतः पुढाकार घेऊन देशभर अशी दुकाने सुरू करण्याचा विचार करीत असताना राज्याचे अाराेग्यमंत्री डाॅ. दीपक सावंत यांनी काळ्याबाजाराची भीती व्यक्त करून अशा दुकानांना विरोध करणे चुकीचे आहे. खरे तर केंद्राची वाट न पाहता गरीब जनतेच्या भल्याकरिता राज्य सरकारने जेनेरिक औषधांची जास्तीत जास्त दुकाने सुरू करणे आवश्यक असल्याचे मत प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित भटकळ यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना व्यक्त केले.

जेनेरिक औषधांचा वापर वाढावा यासाठी भटकळ जनजागृती व प्रयत्न करीत असतात. या विषयावर त्यांनी देशभर फिरून अभ्यासही केला अाहे. अाराेग्य मंत्र्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले, ‘अमेरिकेत ८० टक्के औषधे ही जेनेरिकच असतात. ब्रँडेड औषधांचा वापर तेथे फारच कमी होतो. आपण नेहमी पाश्चात्त्य शैलीचे अनुकरण करतो मग या बाबतीत अमेरिकेचे अनुकरण का केले जात नाही? सर्व प्रगत देशांत जेनेरिक औषधे वापरली जातात फक्त आपल्या देशातच ब्रँडेड औषधांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. तामिळनाडूने १०-१२ वर्षांपूर्वी सर्वप्रथम जेनेरिक औषधे देण्यास सुरुवात केली. तेथील सरकारने यासाठी एक सरकारी कंपनी स्थापन केली आणि औषधांची खरेदी सुरू केली. प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी दुकाने सुरू केली असून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर राजस्थान आणि मध्य प्रदेशनेही जेनेरिक औषधे देण्यास सुरुवात केली. मध्य प्रदेशमध्ये रोज चार लाख नागरिक जेनेरिक औषधे विकत घेतात. या दोन्ही राज्यामध्ये भाजपचीच सत्ता आहे. आपल्या राज्यातही मागील अाघाडीच्या सरकारने जेनेरिक औषधांची दुकाने सुरू करण्याचे ठरवले होते. तत्कालीन अाराेग्य मंत्र्यांनी तशी घाेषणाही केली हाेती. परंतु नंतर त्याचे काय झाले ठाऊक नाही. काही खासगी संस्था आणि व्यक्ती अशी दुकाने सुरू करून जनतेची सेवा करत आहेत,’ अशी माहितीही भटकळ यांनी दिली.

अाराेग्य सेनेचा शिवसेनेशी काहीच संबंध नाही
‘जेनेरिक अाैषधांच्या दुकानांना अाराेग्यमंत्र्यांचाच विराेध’ या बातमीत अाराेग्य सेनेचे अध्यक्ष अभिजित वैद्य यांनी मंत्र्यांच्या भूमिकेला विराेध दर्शवला हाेता. याबाबतचे वृत्त दि. २१ अाॅगस्टच्या ‘दिव्य मराठी’च्या अंकात प्रसिद्ध झाले अाहे. मात्र, त्यात अनावधानाने शिवसेना अाराेग्य सेना असा चुकीचा उल्लेख झालेला अाहे, त्याबद्दल अाम्ही दिलगीर अाहाेत. वैद्य यांच्या अाराेग्य सेनेचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही.

काळाबाजार हाेण्याची भीती तर निराधारच
रमाकांत दाणी, नागपूर - जेनरिक औषधांची दुकाने सुरू केल्याने सरकारी रुग्णालयांतील औषधांचा काळाबाजार होण्याची अाराेग्यमंत्र्यांची भीती निराधार असल्याचे मत नागपुरातील जनमंच या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत असेल तर काळाबाजाराला चालना मिळते. जेनेरिक औषधांच्या बाबतीत असे काहीही नाही. बाजारात जेनेरिक औषधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. एकाच स्वरूपाचे औषध अनेक कंपन्या तयार करीत असल्याने ग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे जेनेरिक औषधांच्या दुकानांना विराेध करण्यापेक्षा अशा दुकानांची साखळी तयार करून गरिबांना माफक दरात औषधांचा पुरवठा करण्याचे राज्य सरकारचे धोरण असले पाहिजे. काळाबाजार झालाच तर त्यावरही सरकारला उपाययोजना करता येतील. मात्र, त्यासाठी जेनेरिक दुकानांना विरोध हा विचार योग्य नाही’, असेही ते म्हणाले. नागपुरात जनमंचने जेनेरिक औषधांची दोन दुकाने सुरू केली असून त्यातून गरिबांना एमआरपीपेक्षाही कमी दराने औषधांचा पुरवठा केला जातो.
‘जेनेरिक’साठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज
मंगेश फल्ले, पुणे - जेनेरिक अाैषधांचा काळाबाजार हाेईल, या भीती तथ्य वाटत नाही. तसेच अशा अाैषधांसाठी स्वतंत्र दुकाने उघडण्याचीही गरज नाही. डाॅक्टरांनी जर प्रिस्क्रिशन या अाैषधांचे लिहून दिले अाणि रुग्णांनीही त्यासाठी अाग्रह धरला तर प्रत्येक मेडिकल स्टाेअर्समध्ये अशी अाैषधे ठेवणे शक्य हाेईल. ग्राहकांच्या अाग्रहाखातर मेडिकल दुकानदारांनीही अशी अाैषधे देण्याचे बंधन केेले पाहिजे, अशी अपेक्षा पुण्यातील अाैषध विक्रेते जयेश कासट यांनी व्यक्त केली.

नामांकित अाैषधांपेक्षा जेनेरिक अाैषधे ही तुलनेने स्वस्त असल्याने त्याचा फायदा सामान्य नागरिकांना मिळताे. मात्र, बहुतांश डाॅक्टर प्रिस्क्रिप्शनमध्ये जेनेरिक अाैषधे लिहून न देता नामांकित कंपन्यांची अाैषधे रुग्णांना लिहून देतात, अशी खंत कासट यांनी व्यक्त केली.
‘रुग्ण दुकानात अाैषध घेण्यास अाल्यानंतर डाॅक्टरांनी लिहून दिलेले अाैषध महाग असले तरी ते घेण्याची मानसिकता त्याची असते. मात्र, तुलनेने स्वस्त असलेली जेनेरिक अाैषधे ताे घेत नाही. त्यामुळे डाॅक्टरांनीच रुग्णास जेनेरिक अाैषधे लिहून दिल्यास, अत्यल्प दरात रुग्णांना चांगली सेवा मिळेल, त्यांची लूट थांबेल. तसेच अाैषधांचा काळाबाजार हाेणार नाही,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पुढील स्‍लार्इडवर जाणून घ्‍या संबंधित विषयाची माहिती..