आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर्मनीत ‘जेट’च्या विमानाचा संपर्क झाला होता खंडित, लढाऊ विमानांनी घेरले होते, 16फेब्रुवारीची घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 330 प्रवासी आणि 15 कर्मचाऱ्यांना घेऊन मुंबईहून लंडनला जाणाऱ्या जेट एअरवेजच्या एका विमानाचा जर्मनीच्या अवकाशात एटीसीशी संपर्क तुटला होता. त्यानंतर काही काळ खळबळ उडाली होती. विमानाच्या अपहरणाचा संशय आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी त्वरित जर्मनीने आपली लढाऊ विमाने पाठवून प्रवासी विमानाची घेराबंदी केली होती. ही घटना १६ फेब्रुवारीची आहे.

जेट एअरवेजने सांगितले की, ९ डब्ल्यू-११८ हे विमान काही मिनिटांतच पुन्हा एटीसीच्या संपर्कात आले आणि लंडनच्या हिथ्रो विमानतळावर सुरक्षित उतरले. विमान उतरताच वैमानिक आणि क्रू सदस्यांना बाहेर काढण्यात आले.
 
या घटनेची माहिती नागरी उड्डयनच्या महासंचालयनालयालाही देण्यात आली. या घटनेची चौकशी केली जात आहे. चुकीची फ्रिक्वेन्सी ट्यून केल्याने विमानाचा संपर्क खंडित झाला होता, असे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले.
बातम्या आणखी आहेत...