आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूला महिलांचे नाव देण्याच्या वक्तव्यावर महाजनांची माफी; राेष वाढताच झाली उपरती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘दारूच्या ब्रँडला महिलांचे नाव दिल्यास खप वाढेल’, असा साखर कारखानदारांना सल्ला देणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याविराेधात राज्यभर राेष व्यक्त केला जात अाहे. त्यामुळे उपरती झालेल्या महाजन यांनी साेमवारी अखेर जाहीर माफी मागितली. ‘विनोदाचा भाग म्हणून मी हे वक्तव्य केले हाेते. त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. मात्र, दिलगिरी हा गुळगुळीत राजकीय शब्द वाटेल म्हणून मी माफी मागतो,’ असे त्यांनी जाहीर केले.  नंदुरबारमधील सातपुडा साखर कारखान्याच्या कार्यक्रमात महाजन यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले हाेते. त्यावर महिला संघटनांनी संताप व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी तर महाजनांविराेधात ‘जाेडे मारा’ अांदाेलनही केले. चंद्रपूरमधील पारोमिता गोस्वामी यांनी महाजनांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली हाेती. 
बातम्या आणखी आहेत...