आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्णकारांच्या संपावर तातडीने तोडगा काढा, विधानसभा अध्यक्षांचे सरकारला निर्देश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- केंद्रसरकारने प्रस्तावित केलेल्या एक टक्का अबकारी कराविरोधात सुवर्णकारांनी पुकारलेल्या संपामुळे ऐन लग्नसराईच्या मोसमात ग्राहकाला झळ पोहोचत अाहे. तसेच या व्यवसायातील लाखो कामगारांवर उपासमारीची वेल आली आहे. त्यामुळे या संपातून मार्ग काढण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शुक्रवारी दिले आहेत.

शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे हा मुद्दा मांडला होता. मात्र या संपाला केंद्र सरकारचे धोरणच जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केल्याने सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या उत्पादनावर केंद्र शासनाने एक टक्का अबकारी कर लावल्याच्या विरोधात राज्यातील सुमारे ३० लाख सुवर्णकारांनी संप पुकारला आहे. गेला महिनाभर सुरू असलेल्या संपामुळे तब्बल ४५ लाख कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यापैकी देशभरातील सात कामगारांनी संपाला कंटाळून आत्महत्या केल्याचा मुद्दा सुनील प्रभू यांनी अौचित्याच्या मुद्द्याद्वारे सभागृहात मांडला हाेता.