आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘गुड टच, बॅड टच’च्या शिक्षणामुळे टळला चिमुकलीवरचा अतिप्रसंग; पोलिसांकडून नोकराला अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कुर्ला परिसरात 6 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या एका 25 वर्षाच्या नोकराला अटक करण्यात आली आहे. शाळेत देण्यात येणाऱ्या ‘गुड टच, बॅड टच’च्या शिक्षणामुळे वाईट स्पर्श करत असल्याचे समजताच या चिमुकलीने आरडाओरडा केला होता. अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून ‘पोलीस दीदी’ उपक्रमाअंतर्गत शाळकरी मुलांना लैंगिक शिक्षण दिले जात आहे. 
 
चिमुकलीचे आईवडील करतात नोकरी
या चिमुकलीचे आईवडील दोघेही नोकरी करतात. त्याच परिसरात ती अन्य 3 मैत्रिणींसोबत खासगी शिकवणीला जाते. चिमुकलीचे पालक आणि अन्य मैत्रिणींचे पालक आलटूनपालटून मुलींना घरी घेऊन येतात. बुधवारी सायंकाळी नेहाला अन्य मैत्रिणीच्या आईने तिच्या घरी नेले. नेहाचे आईवडील कामानिमित्त बाहेर होते. त्यांनी 25 वर्षीय नोकराला नेहाला घ्यायला पाठविले. दीड वर्षापासून तो त्यांच्या दुकानात काम करत असल्याने त्याच्यावर त्यांना विश्वास होता.
 
नेमके काय घडले
नोकराने चिमुकलीच्या मैत्रिणीच्या घरातून घेतले आणि त्याच इमारतीच्या गच्चीवर नेले. तेथे तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र शाळेत पोलिस दीदी उपक्रमाअंतर्गत तिला ‘गुड टच, बॅड टच’चे लैंगिक शिक्षण मिळाले होते. त्यामुळे तिने बचावासाठी आरडाओरडा केला. तो ऐकून गच्चीवर आलेल्या सुरक्षारक्षकामुळे हा प्रकार उघडकीस आणला. कुर्ला पोलिसांनी नोकराला पॉक्सो आणि विनयभंगाच्या गुन्ह्यांत अटक केली आहे. 
बातम्या आणखी आहेत...