आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांची गोची; \'स्वाभिमानी\'च्या सरकारविरोधी मोर्चात राज्यमंत्री खोत, सेनेचे मध्यावधीचे संकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई / कोल्हापूर - आधी सत्तेतील वाटा आणि पदांवरून सत्ताधारी भाजपविरुद्ध दंड थोपटणाऱ्या मित्रपक्षांनी आता शेतकरी कर्जमाफीच्या निमित्ताने पुन्हा सरकारविरुद्ध एल्गार पुकारला आहे. एकीकडे विरोधी पक्षांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्यभर संघर्ष यात्रा काढून सरकारविरोधी जनमानस तयार करण्याचा प्रयत्न चालवला असताना आता सरकारमधीलच स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसेना या मुद्द्यावर थेट रस्त्यावर उतरल्याने देवेंद्र फडणवीस सरकारची गोची झाली आहे.
 
मुख्यमंत्र्यांची गोची - स्वाभिमानी संघटनेच्या सरकारविरोधी मोर्चात राज्यमंत्री सदाभाऊ खोत
शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फडणवीस सरकारविरोधात काढलेल्या मोर्चात त्यांच्याच सरकारमधील कृषी राज्यमंत्री सदाशिव खाेत सहभागी झाले हाेते. या अांदाेलनात सहभागी हाेऊन खाेत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गोची केली.  दरम्यान, शेतकरी कर्जमाफीसाठी २२ ते ३० मे या काळात पुणे ते मुंबईदरम्यान अात्मक्लेश पदयात्रा काढणार असल्याची घाेषणा संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी या वेळी केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी कोल्हापुरात मोर्चा काढला. खोत मंत्री झाल्यापासून शेट्टी आणि खोत यांचे संबंध पूर्ववत राहिलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर खोत यांची मोर्चातील उपस्थिती शेतकऱ्यांसाठी कुतूहलाचा विषय ठरली होती. खोत यांनी मोर्चात वेळेवर उपस्थिती तर लावलीच शिवाय जोरदार भाषणही केले.  शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा लढा मी आणि खासदार शेट्टी आम्ही दोघांनी मिळूनच तुळजापुरच्या तुळजाभवानीला साकडे घालून राज्यात सुरु केला. शेट्टी यांच्यासोबत गेले २५-३० वर्षे मी रस्त्यावरची लढाई लढतो आहे. राज्याचा कानाकोपरा पायाखाली घातला. दोघांनी मिळून अनेक आंदोलने केली. तुरुंगात गेलो. प्रस्थापितांचा रोष झेलला. लाठ्याकाठ्या खाल्ल्या. आंदोलने मला नवी नाहीत, असे खोत म्हणाले. दरम्यान, चळवळीच्या कामात भाग घेण्यापासून मला कोणी अडवू शकत नाही. पदयात्रेत सहभागी होण्यास मला कोणतीही अडचण नाही, असे सभेनंतर  खोत यांनी पत्रकारांना सांगितले.
 राजू शेट्टी आणि सदाशिव खोत यांच्यातील सुप्त संघर्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांपासून लपून राहिलेला नाही. या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते सभेत शेजारी बसले होते. त्यांच्यात औपचारिक हास्यविनोदही झाले. शेट्टी यांनीही भाषणाची सुरुवात “मीही तुमच्याबरोबर आहे असे सांगण्यासाठी आलेले आपले सदाभाऊ,” अशीच केली. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याच्या आंदोलनाची सुरुवात सदाभाऊंनी आणि मी मिळून केली, असेही शेट्टी म्हणाले.
 
- शेतकऱ्यांनीच मला वाढवले, घडवले. त्यांच्या आशीर्वादाने मी आज मंत्रिपदी आहे. शेतकऱ्याचा हा पोरगा नेहमीच शेतकऱ्यांच्या चळवळीत असेल. आयुष्यभर संघर्ष करत आलो आहे. लढायचे माहिती आहे. मी लढणारा वाघ आहे.’
- सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री
 
स्वबळावर सत्ता आणा, सरकार अस्थिर असल्याची भाषा थांबवा : पाटील
भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात कार्यकर्त्यांना स्वबळावर सत्ता आणण्यास तयार राहण्यास सांगितले. सरकारमध्ये असणारे रोज इशारे, धमक्या देतात. सरकार अस्थिर असल्याची भाषा केली जाते. हे थांबवायचे असेल तर भाजपचे १७० आमदार निवडून आणा, असे ते म्हणाले.
 
पुढील स्लाइडवर वाचा, भाजपला संकेत - निवडणुकीच्या तयारीला लागा, उद्धव ठाकरे यांचे आमदारांना आदेश...
 
हे पण वाचा,
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...