आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी अाॅफिस 2 शिफ्टमध्ये सुरू ठेवण्याची मागणी, निवृत्तीचे वय 55 करावे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
मुंबई - आपल्या विविध मागण्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली हाेती. मात्र काही कर्मचारी नेत्यांनी घाईघाईने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून संप मागे घेत सर्व कर्मचाऱ्यांची फसवणूकच  केली, असा अाराेप महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने सोमवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच पाच दिवसांचा अाठवडा करताना लाेकांची गैरसाेय टाळण्यासाठी दाेन शिफ्टमध्ये कार्यालये सुरू ठेवावीत, शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ५५ वर्षेच करावे व त्यांच्या पाल्यांना नाेकरीत सामावून घ्यावे अादी मागण्याही करण्यात अाल्या.  
 
महासंघाचे अध्यक्ष अ. द. कुलकर्णी यांनी सांगितले,  शासनाने राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले, त्यासाठी ३४००० कोटी रुपये लागणार अाहेत. अाता शासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशा वेळी संपकरी नेत्यांनी सबुरीचे धोरण ठेवून संप पुढे ढकलला असता तर त्यांच्यावर एेनवेळी संप मागे घेण्याची नामुष्की ओढवली नसती, असा टाेलाही त्यांनी लगावला. 
 
मुख्यमंत्र्यांना भेटणार  
पाच दिवसांचा आठवडा करताना सकाळी ७ ते दुपारी ३ आणि सकाळी ११ ते सायंकाळी सातपर्यंत दोन पाळ्यांमध्ये कार्यालये सुरू ठेवावीत, यासह अनेक मागण्यांचे पत्र घेऊन मुख्यमंत्र्यांना भेट घेतली जाईल, असे महासंघाने सांगितले.
बातम्या आणखी आहेत...