आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंचन व्यवस्थेसाठी जलस्राेतांचे पुनरुज्जीवन करावे : राज्यपाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘जलयुक्त शिवार अभियान सिंचनाची यशकथा ठरली आहे. शेतीला सिंचनाची व्यवस्था होण्यासाठी भविष्यात राज्यातील नदी, तलाव, कालवे या जलस्राेतांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अभियान हाती घ्यावे’, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मंगळवारी केले. सन २०१४ च्या कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कर्जमाफीचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदनही केले.  
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उपनगराचे पालकमंत्री विनोद तावडे, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई, पशुसंवर्धन दुग्ध विकास  मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत अादी उपस्थित हाेते.  मुख्यमंत्री म्हणाले की, ‘पुरस्कारार्थी हे राज्य शासनाचे ‘कृषिदूत’ आहे. त्यांनी राज्यभर दौरे करून शेतकऱ्यांना आपण केलेल्या प्रयोगांचे मार्गदर्शन करावे. पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे अभिनव प्रयोग राज्यातील अन्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्यास त्यांचा फायदा कृषी उत्पादन वाढीस होईल.’
 
पुरस्काराची रक्कम दिली शेतकरी परिवारांसाठी
जळगाव जिल्ह्यातील तांदलवाडी (ता.रावेर) येथील सदानंद महाजन यांना कृषीभूषण पुरस्कार देवून गौरवण्यात आले. या पुरस्कार स्वरुपात मिळालेली ५० हजार रुपयांची रक्कम महाजन यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केली.  महाजन आणि  त्यांच्या सौभाग्यवतींनी प्रोत्साहनपर रकमेचा धनादेश मुख्यमंत्र्यांना सोपवला. 
बातम्या आणखी आहेत...