आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पानसरे हत्या प्रकरण : समीर गायकवाडच्या जामिनाविरोधात सरकार हायकाेर्टात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काॅ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी समीर गायकवाडला कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या जामिनाविरोधात पानसरे कुटुंबीय व राज्य सरकारने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सनातन संस्थेचा साधक असलेल्या गायकवाडला १७ जून रोजी कोल्हापूर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.   

काॅ. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी माॅर्निंग वाॅकला गेले असताना अज्ञात व्यक्तींनी गाेळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात पानसरेंचा मृत्यू झाला होता, तर त्यांच्या पत्नी बचावल्या होत्या. या हत्येप्रकरणी सप्टेंबर २०१५ मध्ये गायकवाडला अटक केली होती. त्याच्या जामिनाला विरोध करताना पानसरे कुटुंबीयांनी काही मुद्द्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. गंभीर गुन्ह्यातील प्रमुख आरोपीला जामीन देताना त्या खटल्याचे गांभीर्य, संभाव्य शिक्षेचे स्वरूप, साक्षीदार किंवा तक्रारदाराला होऊ शकणारा संभाव्य धोका तसेच आरोपीकडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता अशा विविध घटकांचा विचार होण्याची गरज असल्याची अपेक्षा पानसरे कुटुंबीयांनी न्यायालयाला दिलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे. पानसरे आणि दाभोलकर प्रकरणातील आरोपी एकाच असू शकतात, ही बाबदेखील सत्र न्यायालयाने विचारात घेतली नसल्याचा आक्षेप पानसरे कुटुंबीयांनी अर्जात नोंदवला आहे. 
बातम्या आणखी आहेत...