आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा एक मत थेट सरपंचाला, राज्यातील साडेसात हजार ग्रामपंचायतींचे बिगुल वाजला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात मुदत संपत असलेल्या राज्यातील ७ हजार ५७६  ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दोन टप्प्यांत ७ आणि १४ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. सदस्यांसह सरपंचही थेट जनतेतून निवडले जातील. पहिल्या टप्प्यात विविध १८ जिल्ह्यांतील ३ हजार ८८४; तर दुसऱ्या टप्प्यात १६ जिल्ह्यांतील ३ हजार ६९२ ग्रामपंचायतींसाठी मतदान होईल. दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे.

बीड जिल्ह्यातील सर्वाधिक ७०३ ग्रामपंचायतींची निवडणूक या टप्प्यात होत  आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत राज्यातील सुमारे ८५०० ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. त्यापैकी ऑक्टोबरमध्ये मुदत संपणाऱ्या ११४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम यापूर्वीच जाहीर झाला अाहेे. त्यासाठी २३ सप्टेंबर रोजी मतदान होत आहे. नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये मुदती संपणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर करण्यात आला. 

पहिली मतपत्रिका सरपंचपदाच्या जागेसाठी असेल. या मतपत्रिकेचा रंग फिका निळा असेल. सदस्यपदाच्या मतपत्रिकांचे रंग पूर्वीप्रमाणेच असतील. अनुसूचित जातीच्या जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिका गुलाबी, अनुसूचित जमातीच्या राखीव जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिका हिरवा; तर नागरिकांचा मागासप्रवर्गाच्या जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिका पिवळा असेल. सर्वसाधारण जागेसाठीच्या मतपत्रिका पांढरी असेल.

…तर सातवी उत्तीर्ण आवश्यक
सरपंचपदाची उमेदवार असलेली व्यक्ती १ जानेवारी १९९५ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेली असल्यास किमान इयत्ता सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अशा उमेदवारांना सातवी उत्तीर्णचे प्रमाणपत्र देणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.

१५ सप्टेंबरपासून भरा उमेदवारी अर्ज
पहिला टप्पा : (एकूण ग्रामपंचायती ३८८४) - उमेदवारी अर्ज १५ ते २२ सप्टेंबरपर्यंत दाखल करता येतील. २७ सप्टेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. त्याच दिवशी  निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.  ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. ९ ऑक्टोबरला मतमोजणी हाेऊन निकाल जाहीर.

दुसरा टप्पा (एकूण ग्रामपंचायती ३६९२)- उमेदवारी अर्ज २२ ते २९ सप्टेंबरपर्यंत दाखल करता येतील. ५ अाॅक्टाेबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. त्याच दिवशी  निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. गडचिराेली जिल्ह्यात मात्र ७.३० ते दुपारी ३.०० पर्यंतच मतदानाची वेळ असेल. १६ ऑक्टोबरला निकाल जाहीर.
 
पुढील स्लाइडवर पाहा कसे आहेत दोन्ही टप्पे...
बातम्या आणखी आहेत...