आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजीबाईंची अनोखी शाळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे - म्हटलं जातं की शिकायला वयाचं बंधन नसतं... परंतु अनौपचारिक आणि औपचारिक शिक्षणात हा भेदभाव आपल्याला सहज पाहायला मिळतो. वय वर्षे ६ ते ११ या वयात प्राथमिक शिक्षण व्हावे, असे कायद्यातही नमूद आहे. 
 
मात्र, वयाची साठी उलटलेल्या काही महिला अाता उतारवयात प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवताहेत, हे एेकून नवलच वाटेल. पण ठाणे जिल्ह्यातील फांगणे या छाेट्याशा गावात ही नवलाई प्रत्यक्षात उतरली आहे. गुलाबी गणवेशातील ६० ते ९० वर्षे वयोगटातील २९ ‘आजीबाई’ या शाळेत गणित, व्याकरणाचे धडे गिरवत अाहेत.  अध्ययनातील अनेक बारकावे शिकत आहेत. “आजीबाईची शाळा’ नावाने सुरू असलेली ही संकल्पना आहे ४५ वर्षीय शिक्षक योगेंद्र बांगड यांची. 

मोतीलाल स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने ८ मार्च २०१६ रोजी ही शाळा सुरू झाली. विशेष म्हणजे बहुतांश घरांतील आजीबाई आपल्या लहानग्या नातवंडांना शाळेत पाठवतानाचे चित्र आपण नेहमीच पाहतो. परंतु या शाळेत ५-१० वर्षांची बालके आपल्या आजीबाईंना अगदी टापटीप गणवेश, बॅग, खडू, पाटी, पेन्सिल इत्यादी साहित्यांसह शाळेत आणून सोडतात. ३० वर्षीय शीतल मोरे या विद्यार्थिनींना शिकवतात.
बातम्या आणखी आहेत...