आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखद सोमवार: हळदी समारंभातील उधळपट्टी रोखण्यासाठी चळवळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- "हालदीचाकारेक्रम आज जाेरान झयला पायजे, डालमुंडी, मटान भाकरी अाणि चाखन्याला लालीपाॅप बाेलताे दादुस’ आगरी समाजातील हा टिपिकल डायलॉ ग. विवाहापेक्षा हळदी समारंभाला महत्त्व असल्याने लाखोंची उधळण केली जाते, मद्याचे पाट वाहतात. मुंबई, ठाणे, रायगड भागात ही कूप्रथा प्रतिष्ठेची बनली अाहे. डोंबिवलीनजीकच्या देसाई गावाने मात्र ही उधळपट्टी प्रथा बंद करण्याचा निर्धार करत कडक नियमावली अमलात आणली आहे. त्यांचा हा अादर्श सुमारे १०० गावांनी स्वीकारला. या माध्यमातून एक सकारात्मक चळवळच राहत आहे.

हळदी समारंभाच्या रिवाजाला पूर्वी बेगनी म्हटले जायचे. वराकडची पाच माणसे वधूकडे जायची. वधूपक्षाचे नातलग मिळून ४० ते ५० माणसांचे जेवण असे. ताशाच्या ठेक्यावर नवरदेवाला हळद लावून झाली की रात्री घरी परतायचे. पण खिशात पैसा खुळुखुळु लागला तसा हा समारंभ खर्चिक होत गेला. पहाटेपर्यंत मद्यपान करत डीजेच्या ठेक्यावर नोटांची उधळण, प्रसंगी मारामाऱ्या असे बीभत्स स्वरूप त्याला आले. ही उधळपट्टी रोखण्यासाठी देसाई गावाचे सरपंच शांताराम भोईर यांनी पुढाकार घेतला. बाळाराम म्हात्रे यांची त्यांना मोलाची साथ मिळाली. २०१० पासून ते या बदलासाठी झटत आहेत. पत्रके वाटून जनजागृती करण्यात अाली. हळूहळू विचार पटला तशी भोईर यांना गावागावातून आमंत्रणे येऊ लागली. पाच वर्षांपासूनच्या या उपक्रमाला ठाणे, रायगड िजल्ह्यांतील १०० गावांत चांगला प्रतिसाद िमळत अाहे. सुमारे पाच टक्के लोकांत सकारात्मक बदल झाला असून १७०० गावांत जनजागृती बैठका झाल्या अाहेत. निळजे, दातिवली, कोण, डायघर, नारिवली, दहिसर, नागाव, उत्तरशीव यासह ठाण्यातील अनेक गावे यात आहेत.

नियमावली अशी
-साखरपुडा रद्द. टिळ्याच्या कार्यक्रमाला फक्त १०० लोक आणणे.
-मंडप, व्यासपीठ, बँड वापरावर बंदी. हळदी सोहळ्यात अाॅर्केस्ट्रा, डीजे, मद्यपान बंदी.
- रात्री दहापर्यंतच स्पीकरला मुभा. वरात रात्री बाराच्या आत. तेथेही मद्यबंदी.
- अाेटी भरणासाठी १५ महिलांचाच समावेश. अंत्येष्टी विधी साधा. दशक्रियाचे जेवण नाही.

‘ऋण काढून सण’ नकाेच
^सामान्यांनाहे खर्च परवडत नाही. जमिनी विकून, कर्ज काढून ते हे समारंभ करतात. त्यासाठी देसाई गावात ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ व्यवस्थापक म्हणून काम पाहते. या कूप्रथांमुळे अनेक घरांतील मुलींची लग्ने रखडली आहेत. काही वेळा पाहुण्यांना जेवण पुरले नाही म्हणून होणारी लग्ने मोडली आहेत. त्यामुळे हे बदलाचे काम हाती घेतले अाहे. शांतारामभोईर, सरपंच,देसाई गाव

खर्च टाळल्यास बक्षीसही
एकादिवसात लग्नसोहळा आटोपल्यास भोईर यांनी पहिल्या ११ विवाहांना ११,१११ रुपये बक्षीस देण्याचे ठरवले आहे. शत्रुघ्न सुदाम पाटील (वस्ताद) यांनी पहिल्या दाेन लग्नाला प्रत्येकी ११ हजार रु., समाजसेवक रवींद्र म्हात्रे यांनी प्रत्येक लग्नासाठी ५,१११ रुपये सप्रेम भेट देऊ केले अाहेत.

खर्चाचा विनियाेग
एकाहळदी कार्यक्रमाला किमान तीन लाखांवर खर्च येताे. ही उधळपट्टी टाळून या पैशाचे दागिने करा किंवा बँकेत खात्यात भरा, असे आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी आता तरुणांनी पुढाकार घेणे सुरू केले आहे. महिलांचीही त्याला साथ आहे.

-आगरी समाजात उगवली नवी पहाट
-कोकणातील देसाई गावातील उपक्रम
-शंभर गावे सामील, परिवर्तनाची पहाट
-सरपंच शांताराम भाेईरांचा पुढाकार
-१७०० गावांत जनजागृती बैठका
बातम्या आणखी आहेत...