आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जतमध्ये अत्याचाराचा प्रयत्न झाल्याने तणाव, संतप्त जमावाकडून शहर बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्जत | राशीन - कर्जत शहरातील भांडेवाडी परिसरात गुरुवारी सायंकाळी एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला. काेपर्डीपाठाेपाठ तालुक्यात अशी दुसरी घटना घडल्यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. याच्या निषेधार्थ शुक्रवारी कर्जतमध्ये बंद पाळून लोकांनी काही वेळ रास्ता राेकाे केला. दरम्यान, आरोपी अल्पवयीन असून त्यांची सुधारगृहात रवानगी करण्यात अाली अाहे.
गुरुवारी पीडित मुलगी शौचाला गेली होती. १४ वर्षांच्या मुलाने १० रुपये देण्याच्या बहाण्याने पंचायत समितीसमोरील पडक्या बांधकामात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर ठाण्यात जमाव जमला. पोलिस प्रशासनाने या घटनांच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. या वेळी संतोष मेहत्रे, काँग्रेस तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, संभाजी ब्रिगेडचे राहुल नवले, मनसेचे सचिन पोटरे, भाजपचे अनिल गदादे, शिवसेनेचे गणेश क्षीरसागर उपस्थित होते. पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे व तहसीलदार किरण सावंत यांनी निवेदन स्वीकारले.
बातम्या आणखी आहेत...