आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंग कपड्यांमुळेच वाढतेय बलात्कारांचे प्रमाण, याचिकाकर्त्याच्या युक्तिवादाने वकील संतापले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘अाजकालमहिला परिधान करत असलेल्या तंग कपड्यांमुळेच बलात्कारांचे प्रमाण वाढत चालले अाहे...’ ज्येष्ठ नागरिक, याचिकाकर्ते चंद्रकांत पालव यांनी बुधवारी उच्च न्यायालयात केलेल्या या धक्कादायक युक्तिवादामुळे दाेन्ही बाजूच्या वकिलांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला.

महिलांवरील वाढत्या अत्याचारांविराेधात दाखल विविध खटल्यांची एकत्रित सुनावणी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती नरेश पाटील एस.बी. शुक्ला यांच्यासमाेर सुरू हाेती. यापैकी एक याचिका ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत पालव यांचीही अाहे. अापले म्हणणे न्यायालयासमाेर मांडताना पालव यांनी अतिशय धक्कादायक विधान केले. ‘सध्याच्या जमान्यात महिला अतिशय तंग कपडे जसे जीन्स पँट, कुर्ता, शाॅर्ट टाॅप वापरत अाहेत. त्यामुळे महिलांवरील लैंगिक अत्याचारांचे प्रमाण वाढत अाहेत.’ पालव यांच्या या वक्तव्याने याचिकाकर्त्यांच्या वकिलांसह सर्वच उपस्थित वकील संतप्त झाले त्यांनी पालव यांचा युक्तिवाद राेखण्याचा प्रयत्न केला. पालव यांची बाजू मांडणारे राजीव चव्हाण यांच्यासह महरुख अादेनवाला, माधव जामदार सरकारी वकील पी. पी. काकडे, गीता शास्त्री या वकिलांनी अाक्षेप घेतला. मात्र ‘सामान्य माणसांचे म्हणणेही न्यायालयाला एेकून घ्यावे लागेल,’ असे म्हणत न्यायमूर्तींनी पालव यांना त्यांचे म्हणणे पूर्ण करू द्यावे, असे निर्देश वकिलांना दिले. मात्र वकिलांनी त्यास विराेध केला. त्यामुळे न्यायालयाने पालव यांचा युक्तिवाद थांबवून या प्रकरणाची सुनावणी पुढील अाठवड्यापर्यंत स्थगित ठेवली.

तत्पूर्वी, ‘अत्याचार राेखण्याबाबत नेमलेल्या धर्माधिकारी समितीने काही शिफारशी केलेल्या अाहेत. त्यात पुरुषांच्या मानसिकतेत बदल झाला तर अत्याचार कमी हाेतील,’ अशी सूचना करण्यात अालेली अाहे, याकडे सरकारी वकील पी. पी. काकडे, गीता शास्त्री यांनी लक्ष वेधले.

लहान मुलींवरील अत्याचारांचे काय
‘पालवयांचे मत चुकीचे अाहे. महिलांवरील सातत्याने हाेणाऱ्या अत्याचारांसाठी त्यांच्या पाेशाखाला जबाबदार धरणे अयाेग्यच अाहे. अाणि असेच गृहीत असेल तर तीन-चार वर्षांच्या मुलींवर हाेणाऱ्या अत्याचारालाही त्यांचा पाेशाखच जबाबदार अाहे असे समजायचे का?’ असा उपरोधिक सवाल अॅड. राजीव चव्हाण यांनी पालव यांना केला.